घरमुंबईPulwama Attack : युतीचा विषय सोडा, आधी पाकिस्तानला बघा - उध्दव ठाकरे

Pulwama Attack : युतीचा विषय सोडा, आधी पाकिस्तानला बघा – उध्दव ठाकरे

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ल्याची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करा अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरातातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. आता पाकिस्तानला सोडणार नाही, या तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. हा हल्ला केवळ दहशतवादी हल्ला नाही तर हा गुप्तचर यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा हल्ला असल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करा अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या

पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे अशी देशभरातील सर्व नागरिकांची एकच प्रतिक्रिया आहे. या हल्ल्यानंतर देशातील जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. आता हल्लेखोरांना सोडणार नाही, असं नुसतंच बोलू नका. निवडणुक असो नाहीतर काहीही, निवडणुक प्रचार बाजूला जाऊ द्या आधी पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवावा लागेल

सगली सूत्र यांच्या हातात असून लोकं नेमके काय करतात? त्यांना कळत नसेल तर त्यांना त्या ठिकाणाहून हटवा. असे हल्ले दुर्लक्षित करत असू तर त्यांना हटवले पाहिजे, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. नुसते दंड थोपटून काही होत नाही तर सोक्षमोक्ष लावा. सर्जिकल स्ट्राईक हा आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला होता, मात्र आता पाकिस्तानात घुसावं लागेल, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण देश सरकारच्या मागे

दरम्यान, सध्या सरकारकडून देशातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र पूर्ण देश शांतच आहे. शांत राहण्याशिवाय देशातील जनता काय करु शकते. पण तुम्ही का शांत आहात?, असा सवाल उध्दव ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश सरकारच्या मागे आहे. सगळ्यांनी निषेध केला आहे आता हीच वेळ आहे पाकिस्तानला धडा शिकवायची.

- Advertisement -

युती, निवडणुक चालूच राहणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. या भेटीत शेतकरी आणि बऱ्याच बाबतीत चर्चा झाली. या सगळ्या गोष्टी गौण आहेत. मात्र सध्या विषय अतिशय गंभीर आहे. यात चर्चा आणि उत्तर मिळतील मात्र आता पाकिस्तानला जशास तसं उत्तर देणे हे गरजेचे आहे. युती, निवडणुका हे चालूच राहील, पण पाकिस्तानला आता सोडू नका, असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -