घरमनोरंजनसोनू निगमची दहशतवादी हल्ल्यावर उपहासात्मक टीका

सोनू निगमची दहशतवादी हल्ल्यावर उपहासात्मक टीका

Subscribe

काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जनसामान्यात संतापाची लाट उसळली आहे. देशभर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. बोचऱ्या, उपहासात्मक शब्दात सोनूने टीका केली आहे.

काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जनसामान्यात संतापाची लाट उसळली आहे. देशभर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी ट्वीटरद्वारे संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. यामध्ये गायक सोनू निगमने फेसबुकवर व्हिडिओशेअर करत संताप व्यक्त केला आहे. पुलवामा जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यातील जवानांची संख्या ४० वर पोहचली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सोनू निगमने उपहासात्मक टीका केली आहे.

Being Secular

Posted by Sonu Nigam on Friday, 15 February 2019

- Advertisement -

काय म्हणाला सोनू निगम

नमस्ते भारतीयांनो, काही सीआरपीएफचे जवान शहीद झाले आहेत. त्यावर तुम्ही दु:ख व्यक्त करत आहात असं मी ऐकलय. किती लोग होते ते? ४४ असो किंवा ४४०, तुम्हाला का दुख होत आहे? जे धर्मनिरपेक्षवादी करतात ते तुम्ही करा, जे या दोशात योग्य मानलं जातं. या घटनांवर शोक, दु:ख व्यक्त करणं हे आरएसएस, बीजेपी, हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी संघटनांवर सोडून द्या. जे धर्मनिरपेक्ष लोक करतात ते तुम्ही करा. जर भारतात रहायचं असेल तर भारत तेरे टुकडे होंगे…अफजल हम शर्मिंदा है असे धर्मनिरपेक्ष विचार तुम्ही ठेवले पाहिजेत. इथे वंदे मातरम् बोलणंसुध्द चुकीचं आहे. सीआरपीएफचे जवानच तर शहीद झाले आहेत, यात कोणती मोठी गोष्ट आहे? इथे तर नमस्ते सुध्दा बोलू नका..लाल सलाम’.

- Advertisement -

अशा बोचऱ्या, उपहासात्मक शब्दात सोनूने टीका केली आहे. सोनूप्रमाणे अनेक बॉलिवूड कलाकार, सर्वसामान्य जनता, राजकीय व्यक्ती सोशलमिडीयाचा आधार घेत या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -