घरलाईफस्टाईललहान मुलांमधील कृमीदोष

लहान मुलांमधील कृमीदोष

Subscribe

दीर्घकालीन कृमीदोषामुळे मुलांमध्ये कमजोरी तर येतेच. शिवाय, बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. त्यामुळे कृमीदोषाकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देऊशकत नाहीत. तसेच शाळेतही अनुपस्थित असतात. याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील जवळपास ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणार्‍या जंतांमुळे होतो. जगात २८ टक्के बालकांना आतड्यांमध्ये वाढणार्‍या परजीवी जंतापासून असा कृमी दोष होण्याची शक्यता आहे. याच कृमी दोषाचे राज्यात २९ टक्केे रुग्ण आढळतात. कृमीदोषामुळे ५ ते १९ वयोगातील मुलामुलींना रक्ताक्षय, कुपोषणासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. दीर्घकालीन कृमीदोषामुळे मुलांमध्ये कमजोरी तर येतेच शिवाय, बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. त्यामुळे कृमीदोषाकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. तसेच शाळेतही अनुपस्थित असतात. याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो.

राष्ट्रीय जंतनाशक दिन                                                                                                          मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशाने १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व शालेय वयोगटातील विद्यार्थी (पटावर असलेली व पटावर नसलेली /शाळेत न जाणारे सर्व १९ वर्षांपर्यंतची मुले व मुली) यांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येते.

- Advertisement -

कृमीदोषाची लक्षणे                                                                                                            मोठ्या प्रमाणात जंतूसंसर्ग झाला असल्यास व्यक्तीमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसून येतात. त्यानुसार अतिसार, पोटदुखी, अशक्तपणा तसेच भूक मंदावणे यासारखी गंभीर लक्षणे दिसून येतात. तर सौम्य स्वरूपाचा जंतू संसर्ग झाला असल्यास व्यक्तीमध्ये साधारणपणे कोणतीच लक्षणे आढळत नाहीत. तीव्र प्रमाणात संसर्ग झाल्यास बालक सतत आजारी पडते वा त्याला थकवा जाणवतो. बालकाचा शारीरिक व बौध्दिक विकास खुंटतो, ज्याचा दुष्परिणाम मोठेपणी त्याच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेवर व अर्थार्जनावर होऊ शकतो.

जंतसंसर्ग रोखा                                                                                                                   नियमित शारीरिक स्वच्छता तसेच परिसर स्वच्छता ठेवून जंतसंसर्ग रोखता येतो. जेवणापूर्वी तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात स्वच्छ धुवावेत. नियमित निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे. फळे, भाज्या स्वच्छ, निर्जंतुक पाण्यात धुवावेत. नियमित नखे कापून शारीरिक स्वच्छता ठेवावी. पायात चपला किंवा बूट असूद्या. अनवाणी फिरू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -