घरलाईफस्टाईलसांधेदुखीने त्रस्त आहात? तर हे उपाय करा...

सांधेदुखीने त्रस्त आहात? तर हे उपाय करा…

Subscribe

सांधेदुखीने त्रस्त असलेल्या रग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे काही घरगुती उपाय केल्यानी सांधेदुखी कमी होऊ शकते.

सांधेदुखीने त्रस्त असलेल्या रग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सगळ्यांचा गैसमज आहे की, सांधेदुखी हा आजार उतारवयातच होतो. मात्र, हा आजार तरुणांतही होऊ शकतो. उतारवयातील सांधेदुखी हे शरीराचे वजन पेलणाऱ्या सांध्यांमध्ये होते. तरुण वयातील संधिवात हा शरीरातील बऱ्याच घटकांशी संबंधित आहे. तो बहुतांशी करून हात आणि पाय यातील लहान सांध्यांना व मणका यांना होतो. याच सांधेदुखीवर आपण घरगुती उपाय करून आमार मिळवू शकतो.

सांधेदुखी कमी करण्याचे काही उपाय 

  • निर्गुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सुज व वेदना कमी होतात.
  • जर अशक्तपणा जाणवत असेल आणि त्यामुशळे सांधेदुखीचा त्रास होत असेल तर मेथीचे आणि डिंकाचे लाडू नियमीत खाल्लास सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
  • रोज कणीक घरात मळले जाते. तर कणीक मळत असताना त्यामध्ये एक चमचा एरेंडल तेलाचे मोहन घालून केलेली पोळी किंवा फुलके खावे. यामुळे सर्व सांधेदुखीची समस्या दूर होईल.
  • दररोजच्या आहारात साजूक तूपाचा समावेश केल्याने शरीर स्नेहन होऊन सांधेदुखी सुद्धा कमी होते.
  • सांधेदुखीसाठी काळे तीळ खूप उपयुक्त ठरतात. रात्रभर तीळ पाण्यात भिजवत ठेऊन ते तीळ सकाळी रिकाम्या पोटी खाल्लास सांधेदुखी कमी होणार मदत होते.
  • वातामुळे जर सांधेदुखी होत असेल तर आवळा हा खूप गुणकारी आहे. एक चमच्या आवण्याचा रस आणि आल्याचा रस गुळासोबत घेतले असल्याने सांधेदुखी कमी होते.
  • गरम केलेल्या तिळाच्या तेलात सुंठ चूर्ण, ओवा, हिंग, मोहरी घालून तेल तयार करून तो तेल सांध्यांना मसाज केल्याने सांधेदुखीला आराम मिळतो.
  • सांधेदुखीवर दालचिनी आणि मध हेही प्रभावी औषध ठरते. दालचिनी आणि मधामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे रुग्णाला वेदनांपासून आराम मिळू शकतो. याचबरोबर आखडलेले स्नायू पूर्ववत करण्याचे कामही दालचिनी आणि मध घेतल्यामुळे होऊ शकते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -