घरमहाराष्ट्रपबजी खेळू नको म्हटल्यामुळे, थेट आत्महत्येचा प्रयत्न

पबजी खेळू नको म्हटल्यामुळे, थेट आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

आकाशचं पबजीचं व्यसन सोडवण्याचा प्रयत्न त्याचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून सातत्त्याने करत होते.

‘पबजी’ या व्हर्च्युअल खेळाने सध्या तरुणांच्या मनावर विळखा घातला आहे. कित्येक तरुण या गेमच्या अक्षरश: आहारी गेले आहेत. ‘पबजी’मुळे मुलांच्या मानसिकतेवर आणि बुद्धीवर विपरीत परिणाम झाल्याचं अनेक अहवालातून समोर आलं आहे. याशिवाय पबजी खेळण्यास घरच्यांनी विरोध केल्यामुळे तरूण मुला-मुलींनी टोकातं पाऊल उचलत आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे नाशिकच्या सातपूरा जिल्ह्यामध्ये. सातपूरा येथील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या एका युवकाने पबजी खेळण्यासाठी आईने मनाई केल्यामुळे थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आकाश महेंद्र ओस्वाल असं या १४ वर्षींय तरुणाचं नाव आहे.


वाचा : गुजरातमध्ये ‘पबजी’ खेळणाऱ्या १० जणांना अटक

सूत्रांच्या माहितीनुसार, आकाश हा पबजी खेळाच्या आहारी गेला होता. आकाशचं पबजीचं व्यसन सोडवण्याचा प्रयत्न त्याचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून सातत्त्याने करत होते. शुक्रवारी संध्याकाळी आकाश त्याच्या आईच्या मोबाईलमध्ये पबजी गेम खेळत होता. चिडलेल्या आईने तिचा मोबाईल काढून घेतला आणि पुन्हा मोबाईलला किंवा गेमला हात न लावण्याची आकाशला तंबी दिली. यावेळी गेमची शेवटची लेव्हल अपूर्ण राहिल्यामुळे आकाश भलताच चिडला. रागाच्या आकाशाने रागाच्या भरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आकाशला तात्काळ शिवाजीनगर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. दरम्यान, याप्रकरणाची नोंद सातपूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, आकाशची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -