घरमहाराष्ट्रअकोल्याचे खासदार संजय धोत्रेंना हृदयविकाराचा झटका

अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंना हृदयविकाराचा झटका

Subscribe

भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रेंना तिकीट कापण्याच्या भीतीने हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला जिल्ह्यामधील भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रेंना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती एका खासगी वृत्तसंस्थेने दिली आहे. सध्या त्यांच्यावर अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून धोत्रे यांची एन्जिओप्लास्टी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. एकीकडे राज्यभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना आपली तिकीट कापली जाण्याच्या भीतीने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संजय धोत्रे तिकीट कापण्याने तणावात

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्ष प्रचाराच्या तयारीत असताना गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात तिकीटासाठी संघर्ष सुरु आहे. मात्र, भाजपाकडून धोत्रे यांचे तिकीट कापण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे ते तणावात असून या तणावातून त्यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

अकोल्यात भाजपमध्ये दोन गट

अकोल्यात सध्या भाजप नेते रणजीत पाटील आणि संजय धोत्रे, असे दोन गट भाजपमध्ये पडले आहेत. विकासकामे रखडल्याचा ठपका संजय धोत्रेंवर ठेवला जात आहे. त्यामुळे संजय धोत्रे यांचे तिकीट कापणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, २०१४ लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे जवळपास अडीच लाख मतांनी निवडून आले होते.


वाचा – ६ – अकोला लोकसभा मतदारसंघ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -