घरलोकसभा २०१९जरा हटकेकलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपा - अजित भुरे

कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपा – अजित भुरे

Subscribe

निर्माता-अजित भुरे…

मत द्यायचे नसेल तर अनेक कारणे सांगितली जातात. मी याच्या विरोधात आहे. संतुष्ट- असंतुष्ट ही मतदानाची दोन कारणे असू शकतात. एखाद्या सरकारचे काम आवडले नाही म्हणजे असंतुष्ट होऊन मतदान करता येईल आणि जे सरकार पुन्हा सत्तेत यावेसे वाटते त्यासाठी संतुष्ट होऊन मतदान करता येईल. कोणत्याही व्यक्तीने कारणे देऊ नयेत असे मला वाटते. निदान आपली भारतातील प्रांतरचना, नागरिकांच्या गरजा लक्षात घेतल्या तर त्यांच्या अपेक्षा अद्याप वाढलेल्या नाहीत.

- Advertisement -

अर्थात ज्या अपेक्षा आहेत त्याच पूर्ण न झाल्यामुळे कदाचित असे असू शकते. आता सध्यातरी या सामान्य माणसाच्या गरजा काय असतील तर पाणी, वीज, रस्ते. या गोष्टी जरी सरकारने आवश्यकतेप्रमाणे पुरवल्या तरी सामान्य माणूस आनंदी होईल यावर माझा विश्वास आहे. त्याला फक्त जगायचे आहे आणि जगण्यासाठी ज्या गरजा आहेत, त्या पुरवल्या म्हणजे तो नाराज होईल असे वाटत नाही इतका हा सामान्य माणूस हळवा आणि गरजवंत आहे.

महागाई ही दिवसेंदिवस वाढते आहे, त्यानेच तो अर्धाअधिक बेजार झालेला आहे. सरकारने व्यवस्थित नियोजन करून सामान्य माणसाच्या या माफक अपेक्षा पूर्ण करायला हव्यात. निर्माता, अभिनेता आणि व्यावसायिक मराठी नाट्य निर्माता संघाचा अध्यक्ष या नात्याने एक खंत व्यक्त करावीशी वाटते. ती म्हणजे कलाकाराच्या अभिस्वातंत्र्यावर कुठलेही बंधन आणू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -