घरमनोरंजनअनुराग बासू आणि कंगनाची पुन्हा एकदा प्रेमकथा

अनुराग बासू आणि कंगनाची पुन्हा एकदा प्रेमकथा

Subscribe

पुन्हा एकदा नवी प्रेमकथा घेऊन कंगना आणि अनुरागची जोडी परत येत आहे. 'इमली' अर्थात चिंच अशा विचित्र नावाचा चित्रपट दोघं एकत्र घेऊन येत आहेत.

‘गँगस्टर’मधून बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना राणौतला अनुराग बासूनं पहिल्यांदा संधी दिली. त्यानंतर कंगनानं कधी मागे वळून पाहिलंच नाही. पुन्हा एकदा नवी प्रेमकथा घेऊन कंगना आणि अनुरागची जोडी परत येत आहे. ‘इमली’ अर्थात चिंच अशा विचित्र नावाचा चित्रपट दोघं एकत्र घेऊन येत आहेत.

अनुराग कंगनाचा गॉडफादर

चित्रपटाविषयी अजून जास्त कोणताही तपशील माहिती नसला तरीही ही एक शहरी प्रेमकथा असल्याचं स्रोतांकडून सांगण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण हा चित्रपट करत असल्याचं कंगनानंदेखील स्पष्ट केलं आहे. यापूर्वी काईट्स हा अनुराग बासूचा चित्रपट कंगनानं केला होता. पण त्यानंतर त्यांच्यामध्ये काही आलबेल नसल्याच्या अफवा होत्या. पण हा चित्रपट केवळ अनुरागसाठी आपण केला असून अनुराग आपला गॉडफादर असल्याचं कंगनानं सांगितलं होतं. अनुरागला आपण कधीही नकार देऊ शकत नाही, त्याच्यामुळंच आपलं करिअर घडलं असंही तिनं स्पष्ट केलं होतं. आता पुन्हा या चित्रपटासाठी दोघं एकत्र येत असल्यामुळं त्या दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

कंगना सध्या व्यस्त

सध्या राजकुमार रावबरोबर लंडनमध्ये ‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या चित्रीकरणात कंगना व्यस्त असून दुसऱ्या बाजूला ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ हा तिचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सगळ्यात व्यस्त असल्यामुळं या वर्षाच्या शेवटी अनुराग बासूच्या ‘इमली’साठी कंगना चित्रीकरणाला सुरुवात करेल. या चित्रपटाची तयारी ऑगस्टपासून सुरु होईल. तर याव्यतिरिक्त कंगना अश्विनी अय्यर तिवारीच्या कबड्डीवर आधारित चित्रपटालाच्या चित्रीकरणालादेखील लवकरच सुरुवात करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -