घरमुंबईखुल्या बाजारात औषधांची बेकायदा विक्री

खुल्या बाजारात औषधांची बेकायदा विक्री

Subscribe

रॅकेटमधील आणखी पाच जणांना अटक

संरक्षण दलासह शासकीय रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेली औषधे बेकायदेशीररीत्या मिळवून, सदर औषधे खुल्या बाजारात विक्री करणार्‍या टोळीतील आणखी काही व्यक्तींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करून परराज्यातून आणखी काही व्यक्तींना अटक केली असली तरी या रॅकेटमागचे मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

संरक्षण दल अथवा शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत वितरीत करण्यात येणारी काही औषधे ही सानपाडा येथील श्री समर्थ डिस्ट्रीब्युटर्स तसेच तळोजा येथील मे. मेडलाईफ इंटरनॅशनल प्रा.लि. याथून विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी या दोन्ही एजन्सीच्या पेढीवर छापे मारून मोठ्या प्रमाणात शासकीय औषधांचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून सानपाडा व तळोजा पोलिसांनी दोन्ही औषध पेढीच्या चालक मालकांवर फसवणुकीसह, बनावटगिरी, औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या महेश गणसुरे (36), सचिन वडसकर (29) आणि सचिन बलदवा (37) या तिघांना अटक केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने पुण्यातून रॉयल फार्माचा निरजकुमार सिंग (26), दिल्लीतून विशाल फार्माचा संजय गर्ग (49), हरियाणा जमालपुरा येथील सतगुरु फार्माचा बिशनदास मदान (30) उत्तर प्रदेश आगरा येथील हिंदुस्थान मेडिकोचा हरप्रसाद गुप्ता (47) आणि आगरा मधूनच शिवम अनिल गुप्ता या पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या सगळ्यांची जामिनावर मुक्तता केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गव्हर्नमेंट सप्लायचा ठसा रसायनाने काढला
संरक्षण दलासाठी शासनाकडून घेतली जाणारी औषधे डिस्ट्रीब्युटर्सकडे पोहोचल्यानंतर औषधांच्या कार्टन बॉक्सवर व लेबलवरील डीफेन्स सप्लाय, इएसआयएस सप्लाय, दिल्ली गव्हर्नमेंट सप्लाय असे लिहिले गेलेले थिनरच्या सहाय्याने खोडले जाऊन ती औषधे एमआरपी प्रमाणे खुल्या बाजारात विकली जात होती. या औषधे विक्रीतून मिळणारी रक्कम रॅकेटमध्ये सहभागी असलेले सर्व जण वाटून घेत असल्याचे तपासात आढळून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -