घरदेश-विदेशकाँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांपेक्षा गुंडांना जास्त किंमत - प्रियांका चतुर्वेदी

काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांपेक्षा गुंडांना जास्त किंमत – प्रियांका चतुर्वेदी

Subscribe

काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांपेक्षा गुंडांना जास्त किंमत, असे काॅंग्रेसच्या प्रवक्त प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत. काॅंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची छेडछाड केली होती. तरिही या कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी नाराज झाल्या आहेत.

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज आपल्याच पक्षातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वतःचे रक्त आटवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा महिलांशी गैरवर्तणूक करणाऱ्या गुंडाना पक्षात जास्त किंमत आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तवणूक केले होते. त्यामुळे या कार्यकर्त्यांना निलंबित करण्यात आले होत. परंतु, आता पुन्हा आता त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे प्रियांका नाराज झाल्या आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना काही काँग्रेस कार्यकत्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्याशी गैरवर्तणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावर कारवाई करत राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी संबंधित लोकांना पार्टीतून निलंबित केले होते. परंतु, काहीच दिवसात त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत चतुर्वेदी म्हणाल्या की, ‘ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आपल्याला धमकावले, त्यांना कोणतीही शिक्ष न देता सोडले जात आहे हे फार दुर्भाग्यपूर्ण आहे.’ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन त्यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -