घरमहाराष्ट्रअकोल्यात ईव्हीएम मशीन फोडले; तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

अकोल्यात ईव्हीएम मशीन फोडले; तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Subscribe

पोलिसांनी श्रीकृष्ण घ्यारे याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनला विरोध असल्यामुळे हे कृत्य केले असल्याचा दावा श्रीकृष्णा याने केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. १३ राज्यातील ९७ लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १० मतदारसंघामध्ये सकाळपासून मतदान सुरु आहे. मतदाना दरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अकोला, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी या मतदारसंघामध्ये मतदाना दरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. याच दरम्यान, अकोल्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे एका मतदाराने संतप्त होत ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली आहे.

अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातील कवठामध्ये ही घटना घडली आहे. ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे संतप्त झालेल्या श्रीकृष्ण घ्यारे नावाच्या एका मतदाराने मशीन फोडली. पोलिसांनी श्रीकृष्ण घ्यारे याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनला विरोध असल्यामुळे हे कृत्य केले असल्याचा दावा श्रीकृष्णा याने केला आहे. या घटनेमुळे कवठा गावातील मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. मतदान केंद्राबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -