घरदेश-विदेशराहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध

राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध

Subscribe

अमेठीचे निवडणूक अधिकाऱ्यांकडे राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांच्या शैक्षणिक योग्यता आणि नागरिकत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते.

अमेठी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढत असलेले काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांची उमेदवारी वैध आहे. दोन तासांच्या सुनावणीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय दिला आहे. काही विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरताना चूकीची माहिती दिली असल्याचा आरोप केला होता. तसंच राहुल गांधी यांच्या शैक्षणिक योग्यता आणि नागरिकत्वाबाबत विरोधकांनी आक्षेप घेत त्यांचा अमेठीतील उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जाची तपासणी केल्यानंतर त्यांची उमेदवारी वैध असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात मैदानात उतरले आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार

अमेठीचे निवडणूक अधिकारीनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्जामध्ये काहीच समस्या नाही. तसंच त्यांचे नामांकन वैध आहे. दरम्यान, अमेठीचे निवडणूक अधिकाऱ्यांकडे राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांच्या शैक्षणिक योग्यता आणि नागरिकत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. याबाबत राहुल गांधी यांचे वकिल के सी कौशिक यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी १९९५ साली यूनिव्हर्सिटी ऑफ कँब्रिज येथून एमफीलचे शिक्षण पूर्ण केले. मी त्यांच्या सर्टिफिकेटची एक प्रत उमेदवारी अर्जासोबत जोडली होती.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांनी जिल्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे राहुल गांधी यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यांनी असे आरोप केले होते की, राहुल गांधी यांनी ब्रिटिश नागरिकत्व घेतले होते. त्यांनी ब्रिटनमध्ये रजिस्टर असलेल्या एका कंपनीच्या कागदपत्राच्या आधारावर हा दावा केला होता. त्याचसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शैक्षणिक योग्यतेबाबतही अनेक त्रुटी असल्याचा आरोप केला होता.

राहुल गांधींकडे दुसऱ्या देशाचे नागरिकत्व

ध्रुवलाल यांनी असे देखील म्हटेल आहे की, राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाबत काही माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये ते भारतीय नसून त्यांनी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. यासंबंधित अनेक दस्तावेज असल्याचे त्यांनी सांगितले. यावरुनच त्यांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता.

- Advertisement -

हेही वाचा – 

‘चौकीदार चोर है’ या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी मागितली माफी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -