घरदेश-विदेशपश्चिम बंगालमध्ये मतदानापूर्वी हिंसाचार; भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या

पश्चिम बंगालमध्ये मतदानापूर्वी हिंसाचार; भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या

Subscribe

मिदनापुर येथे टीएमसीच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळी झाडण्यात आली आहे. दोन्ही कार्यकर्त्यांवर तमलुक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी ७ राज्यांमध्ये मतदान सुरु आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्यापूर्वीच हिंसाचाराची घटना घडली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराच्या घटना वारंवार समोर येत असतात. याठिकाणी भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये नेहमी वाद होत असतो. याचा प्रत्यय आज दिसून आला आहे. मतदानापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे मृतदेह सापडले आहे. रामेन सिंह असं भाजपच्या कार्यकर्त्याचे नाव असून त्याची हत्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप भाजपने केसला आहे. तर दुसरीकडे तृणमूलच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरु

पश्चिम बंगालमध्ये ८ मतदार संघामध्ये मतदान होत आहे. मात्र मतदान सुरु होण्याआधीच पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या केल्याची घटना घडली. ही घटना झारग्राम येथे घडली. हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव रामेन सिंह आहे. भाजप कार्यकर्त्याव्यतिरिक्त टीएमसीचे एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला. तसंच मिदनापुर येथे टीएमसीच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळी झाडण्यात आली आहे. दोन्ही कार्यकर्त्यांवर तमलुक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दरम्यान, बेल्दामध्ये टीएमसी कार्यालयावर देखील हल्ला करण्यात आला आहे. टीएमसीने या घटनेला भाजपला जबाबदार ठरवले आहे.

- Advertisement -

झारग्राममध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

पश्चिम बंगालच्या झारग्राममध्ये मतदान सुरु आहे. भाजपने आरोप केला आहे की, टीएमसी कार्यकर्त्यांनी रामेन सिंह यांना मारहाण करत त्यांची हत्या केली. त्यांचा मृतदेह झारग्राम जिल्ह्याच्या चुनसोले गावामध्ये सापडला. स्नानिक पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही दिवसापासून रामेन सिंह आजारी होते. पोस्टमॉर्टमसाठी त्यांचा मृतदेह पाठवण्यात आला आहे.

टीएमसी कार्यकर्त्याची हत्या

मरधाराच्या कांठीमध्ये टीएमसी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. पार्टीचे कार्यकर्ता मैती रविवारी रात्री गायब होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. असे सांगितले जात आहे की, ते रात्री उशीरा एका नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते. मात्र त्या ठिकाणावरुन ते परत घरी आलेच नाही. ही हत्या कधी आमि कशी झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -