घरदेश-विदेशLoksabha Election Live Update: ३ वाजेपर्यंत ४६.५२ टक्के मतदान

Loksabha Election Live Update: ३ वाजेपर्यंत ४६.५२ टक्के मतदान

Subscribe

देशातील सात राज्यांमध्ये ५९ मतदार संघात होणार्‍या मतदानात एकूण ९७९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये आज बंद होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील सात राज्यांमध्ये ५९ मतदार संघात होणार्‍या मतदानात एकूण ९७९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये आज बंद होणार आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित, भोजपुरी स्टार मनोज तिवारी, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, पश्चिम बंगालमधील ८, बिहार ८, मध्य प्रदेश ८ दिल्ली ७ आणि झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -