घरमुंबईअंबरनाथच्या कंजारभाट समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

अंबरनाथच्या कंजारभाट समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

Subscribe

समाजातील कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या विवेक तमायचिकरने आजीच्या अंतिम दर्शनासाठी विरोध करणाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या निषेधार्थ समाजातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

कौमार्य चाचणीच्या विरोधात लढा देणाऱ्या विवेक तमायचिकर यांच्या कुटुंबावर कंजारभाट समाज जातपंचायतने बहिष्कार घातला आहे. विवेकच्या आजी रोमलाबाई तमायचिकर यांच्या निधनानंतर तेथे जाण्यास जातपंचायतने कथीतरीत्या विरोध केला होता. या बाबत विवेकने जातपंचायतच्या सरपंच व इतर ३ व्यक्तींच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आमच्या समाजात कोणत्याही प्रकारची कौमार्य चाचणी घेतली जात नाही. आतापर्यंत शेकडो लग्ने झाली. मात्र एकही मुलगी अथवा महिलेने याबाबत तक्रार केलेली नाही. विवेक तमायचिकर याने संपूर्ण समाजाला बदनाम केले आहे. जिथेजिथे लग्न होतात तिथे विवेक पोलीस घेऊन कौमार्य चाचणी बाबत तक्रार करीत असतो. त्याच्या खोट्या तक्रारीमुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. त्याच्या आजीच्या अंत्यसंस्कारवर आम्ही बहिष्कार टाकलेला नाही. हा गुन्हा खोट्या माहितीच्या आधारे नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा मागे घेण्यात यावा. त्याचप्रमाणे विवेकच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करावा.
अॅड. विशाल गारुंगे

- Advertisement -

आमच्या सरपंच व इतर व्यक्तींच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. यामुळे जे परिणाम होतील त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील.
सरस्वती अभंगे, मोर्च्यात सहभागी

या प्रकरणात आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. तसेच सरकारकडे दाद मागू. या प्रकरणी कंजारभाट समाजाच्या महिलांच्या शिष्टमंडळाने अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. घुगे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

सविता तमायचिकर, मोर्च्यात सहभागी

परिणामी गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कंजारभाट समाजाच्या पुरुष व महिलांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या मोर्चात प्रामुख्याने महिलांचा सहभाग होता. या प्रकरणी कंजारभाट समाजाच्या महिलांच्या शिष्टमंडळाने अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांची भेट घेतली. यावेळी महिलांनी लेखी निवेदन सादर केले. या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घुगे यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -