घरदेश-विदेशपराभव अर्जेंटिनाचा, टेन्शन केरळमध्ये; युवकाची आत्महत्या?

पराभव अर्जेंटिनाचा, टेन्शन केरळमध्ये; युवकाची आत्महत्या?

Subscribe

अर्जेंटिनाचा पराभवाचा टेन्शन घेऊन केरळमधील एक तीस वर्षीय तरुण आत्महत्येचे पत्र लिहून घर सोडून निघून गेला आहे.

जगातील सर्व फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या लिओनेल मेस्सीचा फॅन फॉलोइंग फक्त अर्जेंटिनाच नाही तर जगभरात देखील आहे. भारतातही मेस्सीचे अनेक डायहार्ड फॅन आहेत. फिफा वर्ल्डकप २०१८ मध्ये क्रोएशियाविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाला दारूण पराभव पत्करावा लागला. या पराभवाचा आघात अर्जेंटिनाला व्हायला हवा, मात्र तो झालाय केरळमधील मेस्सीच्या एका डायहार्ड फॅनला. होय, हा केरळमधील एक तीस वर्षीय तरुण आत्महत्येचे पत्र लिहून घर सोडून निघून गेला आहे.


विश्वचषकातील पहिला सामना बरोबरीत आणि दुसऱ्या सामन्यात क्रोएशियाकडून ३-० च्या फरकाने पराभव पत्करल्यानंतर अर्जेंटिनाचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. अशावेळी जगभरातील मेस्सी फॅन्सकडून निराशा व्यक्त केली जात आहे. अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील व्यक्त केल्या आहेत. मात्र केरळमधील दिनू अलेक्स या तरूणाने तर चक्क सुसाइड नोट लिहून घरच सोडले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान त्याने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्याने या नोटमध्ये लिहिले आहे की, मला या पराभवामुळे प्रचंड दुःख झाले असून मी माझे आयुष्य संपवत आहे आणि माझ्या आत्महत्येसाठी कोणालाच जबाबदार धरू नये.” दिनूच्या या सुसाइड नोटमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दिनूने घर सोडले असले तरी अद्द्याप त्याचा मृतदेह सापडलेला नाही. दिनूचे काय झाले? त्याने खरच आत्महत्या केली का? आता तो कुठे आहे? असे अनेक प्रश्न पोलिसांसह सर्वांनाच पडले आहेत. सध्या पोलीस घटनेचा तपास करत असून अजूनही पोलिसांच्या हाती ठोस अशी माहिती लागलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -