घरमुंबईकेडीएमसी: धोकादायक इमारत की लाचखोरीच्या ट्रॅपची धास्ती?

केडीएमसी: धोकादायक इमारत की लाचखोरीच्या ट्रॅपची धास्ती?

Subscribe

केडीएमसीच्या सी. वॉर्डची इमारत धोकादायक झाल्यामुळे हे कार्यालय स्थलांतरीत होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पालिकेचे सर्वाधिक लाचखोरीचे सापळे या  इमारतीत लागले आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतीपेक्षा लाचखोरीच्या ट्रॅपची धास्ती इथल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना असल्याचे बाेललं जात आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सर्वात चर्चेत असणारे सी. वॉर्ड कार्यालय येत्या दोन ते तीन दिवसात सांगळेवाडी येथील सर्वोदय गार्डन परिसरातील संकुलात स्थलांतरीत होणार आहे. सी. वॉर्डची इमारत धोकादायक झाल्यामुळे हे कार्यालय स्थलांतरीत होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पालिकेचे सर्वाधिक लाचखोरीचे सापळे या  इमारतीत लागले आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतीपेक्षा लाचखोरीच्या ट्रॅपची धास्ती इथल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना असल्याचे बाेललं जात आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

केडीएमसीच्या मुख्यालयाच्या शेजारीच असलेल्या इमारतीत पालिकेचे सी. वॉर्ड कार्यालय आहे. तळ अधिक दोन मजल्याची ही इमारत आहे. मात्र अनेक वर्षापासून ही इमारत धोकदायक बनली असून तेथूनच  पालिकेचा कारभार सांभाळला जात आहे. इमारतीचे स्लॅबचे प्लास्टर पडले असून पावसाळयात इमारतीला गळती लागते. त्यामुळे पावसाळयात प्लॅस्टीक लावून कर्मचारी काम करताना पाहावयास मिळतात. पालिकेचे कार्यालय नवीन ठिकाणी हलविण्यात यावे अशी इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र अनेक वर्षानंतर आता त्या मागणीला मुहूर्त मिळाला आहे. कल्याण पश्चिमेतील सांगळेवाडी परिसरात एका इमारतीत हे कार्यालय हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे सी. वॉर्डातील प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यापासून ते शिपायापर्यंत अनेक कर्मचारी ही लाचखोरीच्या जाळयात सापडले आहेत. सर्वाधिक लाचखोरीचे ट्रॅप सी. वॉर्डात लागले आहेत. त्यामुळे  या इमारतीत काम करण्यास अधिकारी आणि कर्मचारी इच्छूक नाहीत. सी. वॉर्डचे कार्यालय दुसऱ्या इमारतीत स्थलांतरीत करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. सी. वॉर्डातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे रजेवर गेले आहेत. हे कार्यालय नवीन जागेत शिप्ट झाल्यानंतरच रूजू होण्याचा निर्धारही अनेकांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी धोकादायक इमारतीपेक्षा लाचखोरीच्या ट्रॅपची अधिक धास्ती लागली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -