घरमहाराष्ट्रप्रदेशाध्यक्ष पदाचा अजून निर्णय झालेला नाही - सुधीर मुनगंटीवार

प्रदेशाध्यक्ष पदाचा अजून निर्णय झालेला नाही – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

रावसाहेब दानवे यांनी केंद्रिय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद कोणाजवळ जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चेवर सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी केंद्रिय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद रिकामे झाले आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदाबाबत भाजप पक्षात कोणत्याही प्रकारची रस्सीखेच चाललेली नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. यापुढे ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पक्षाकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. याशिवाय ज्याला प्रदेशाध्यक्ष पद दिले जाईल तो चोखपणे आपली जबाबदारी पार पाडेल. जर आपल्याला पद देण्यात आले तर आपणही जबाबदारी योग्यरित्या पार पाडू, असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत.

राज ठाकरेंवर केली टीका

सुधीर मुनगंटीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मनसे हा पक्ष आता दुर्मीळ पक्षीसारखा राहिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने कोणत्याही प्रकारची उमेदवारी लढवलेली नाही. तरीदेखील राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात सभा घेतल्या. परंतु, लोक सगळं जाणतात. त्यामुळे लोकांनी मोदी सरकारची पुन्हा एकदा निवड केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -