घरक्रीडाWorld Cup 2019: पावसाने घात केला, रंगात आलेला सामना थांबला

World Cup 2019: पावसाने घात केला, रंगात आलेला सामना थांबला

Subscribe

पावसाने विश्वचषक स्पर्धेतील अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणारा सामना थांबवला आहे.

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील सातवा सामाना खेळला गेला. दरम्यान, या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्येच पावसाने व्यत्यय आणला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याची पहिली इनिंग संमिश्र स्वरुपाची ठरली. कारण श्रीलंकेचे सलामीवीर दीमूथ आणि कौसल परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागिदारी केली. मात्र त्यानंतर श्रीलंकेची मधली फळी फलंदाजीत पूर्णपणे पोकळ ठरली. यामागे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरली. दरम्यान सुरुवात जोरदार करणाऱ्या संघाच्या एकामागे एक विकेट पडल्याने सामन्यातील उत्सूकता आणि रंगत वाढली होती. मात्र, पावसामुळे हा खेळ थांबवावा लागला.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. श्रीलंकेच्या सलामीवीर गडींनी पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागिदारी केली. यात कर्णधार दीमूथने ४५ चेंडूत ३० धावा केल्या. तर कुसल परेराने ८१ चेडूत ७८ धावा केल्या. त्यानंतर कुसल परेराने लहिरुसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लहिरु देखील २५ धावा करुन बाद झाला. लहिरु नंतर श्रीलंकेच्या संघाला उतरती कळा लागली. कुसल मेंडीस, अँगेलो मेथिस आणि धनंजया सिल्वा एकापाठोपाठ बाद झाले. कुसल परेरा ७८ धावांवर बाद झाला. श्रीलंकेने ३३ षटकांत ८ बाद १८२ धावा केल्या. दरम्यान, वातावरणात बदल होऊन पाऊस सुरु झाला. पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे.

- Advertisement -

मोहम्मद नाबीची जबरदस्त कामगिरी 

अफगाणिस्तानचा गोलंदाज मोहम्मद नाबीने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने श्रीलंकेच्या ४ गड्यांना बाद केले. याशिवाय त्याने ९ षटकांत फक्त ३० धावा दिल्या आहेत. यासोबतच दौलत झद्रन, हमिद हसन आणि राशिद खान यांनी प्रत्येक एक विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा – भारतीय प्रसारमाध्यमे टीम इंडियावर नाराज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -