घरमहाराष्ट्रधक्कादायक! पुण्यातील चित्रपटगृहांमध्ये खराब समोशांची विक्री

धक्कादायक! पुण्यातील चित्रपटगृहांमध्ये खराब समोशांची विक्री

Subscribe

चित्रपटगृहांमध्ये अव्वाच्या सव्वा किंमतीत मिळणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चित्रपटगृहांमध्ये अव्वाच्या सव्वा किंमतीत मिळणारे पदार्थ गुणवत्तेच्या बाबतीत दर्जेदारच असणार अशी खात्रीच प्रेक्षकांना असते. मात्र पुण्यातील चित्रपटगृहात खराब, दर्जाहीन समोस्यांची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी अन्न आणि औषध पुरवठा विभागाने संबंधीत समोसा उत्पादकावर कारवाई केली आहे. या घटनेमुळे चित्रपटगृहांमध्ये अव्वाच्या सव्वा किंमतीत मिळणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे शहरातील आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलीस, विशाल इ-स्क्वेअर या चित्रपटगृहांमध्ये अत्यंत गलिच्छ ठिकाणहून सामोसा येत असल्याचे समोर आले आहे. या सामोशाचे उत्पादन तात्काळ बंद करण्यात आले आहे. समोसा पुरवठा करणाऱ्या समोशाच्या दुकानातले उत्पादन बंद करण्याचे आदेश अन्न आणि औषध पुरवठा विभागाने दिले आहेत.
पिंपरीमधल्या खराळवाडी येथे समोशांचे उत्पादन करणाऱ्या एम. के. एन्टरप्रायजेसवर अस्वच्छ ठिकाणी समोशांचे उत्पादन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

गलिच्छ, अस्वच्छ ठिकाणी समोशांचे उत्पादन

पुणे शहरातील आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलीस, विशाल इ-स्क्वेअर या चित्रपटगृहांमध्ये मिळणारे समोसे दर्जाहीन, अस्वच्छ असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अन्न व औषध पुरवठा विभागाने संबंधित समोसा उत्पादकावर कारवाई करत समोशाचे उत्पादन तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईत अतिशय अस्वच्छ, गलिच्छ ठिकाणी समोशांचे उत्पादन होत असल्याचे समोर आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -