‘या’ विक्रमात भारतीय खेळाडूंच्या पंक्तीत विराट कोहली सातव्या क्रमांकावर

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत आहे.

few year time we will miss Kohli the captain said akash chopra
IPL 2021 : लवकरच विराटला सर्वजण मिस करतील, माजी खेळाडूचं मोठं विधान

विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा रविवारी ऑस्ट्रे्लियाच्या विरोधात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा हाच निर्णय महत्त्वाचा ठरला. कारण भारताने जबरदस्त फलंदाजी करत ऑस्ट्रेलियापुढे ३५३ धावांचे आव्हान दिले. भारताचे दोन्ही सलामीवीरांनी चांगले प्रदर्शन दाखवले. रोहित शर्माने ५६ धावा केल्या. तर शिखर धवनने ११७ धावा केल्या. याशिवाय भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८२ धावा केल्या. या धावांसोबतच विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आपल्या आयुष्यातील ५० वे अर्धशतक बनवले आहे. त्यामुळे ५० वेळा अर्धशतक बनवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचा सातवा क्रमांक लागला आहे.

‘या’ खेळाडूंनी केले आहेत ५० अर्धशतक

विराट कोहलीने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या सलामी सामन्यात शतक झळकावले होते. हा सामना बांग्लादेश विरोधात खेळला गेला होता. त्यानंतर २०१५ च्या देखील विश्वचषक स्पर्धेच्या सलामी सामन्यात कोहलीने शतक मारले होते. हा सामना पाकिस्तानच्या विरोधात होता. यावर्षीच्या सलामी सामन्यात विराटला फक्त १८ धावांवर समाधानी राहावे लागले होते. त्यानंतर रविवारी झालेल्या सामन्यात विराटने जबरदस्त अर्धशतक झळकारले. हे अर्धशतक त्याच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील ५० वे अर्धशतक होते. त्यामुळे ५० अर्धशतक बनवणाऱ्या भारतीयांच्या यादित भारताचा सातवा क्रमांक लागला आहे. याअगोदर सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगूली, महेंद्र सिंह धोनी, युवराज सिंह आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी ५० अर्धशतक झळकावले आहेत.