घरमनोरंजनबिहारमधील शेतकऱ्यांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन

बिहारमधील शेतकऱ्यांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन

Subscribe

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील शेतकऱ्यांना मदत केली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील २१०० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. याबाबतची माहिती अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगद्वारे दिली आहे. यामध्ये त्यांनी आश्वासन पूर्ण केले असल्याचे लिहिले आहे. बिहारमधील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत होते, त्यापैकी २१०० शेतकऱ्यांची निवड करून आणि ओटीएससह त्यांची रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांना श्वेता आणि अभिषेक बच्चन यांच्या हस्ते व्यक्तिशः मदत करण्यात आली.

यापूर्वी ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहीले होते की, जे लोक कर्जफेड करण्यास असमर्थ आहेत अशांसाठी एक भेटवस्तू आहे. आता ते बिहार राज्यातील असतील. यंदा पहिल्यांदाच अमिताभ बच्चन शेतकऱ्यांना मदत करत नसून यापूर्वी मागील वर्षी त्यांनी उत्तरप्रदेशातील १ हजारहून अधिक शेतकऱ्यांची कर्जफेड केली होती.

- Advertisement -

पुलवामातील शहिदांच्या कुटूंबियांना करणार मदत

आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन पुढे लिहितात की, आणखीन एक आश्वासन पूर्ण करायचे आहे. देशासाठी पुलवामा येथे ज्या शूरवीरांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली त्यांच्या पत्नी आणि कुटूंबियांना आर्थिक मदत करायची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -