घरहिवाळी अधिवेशन २०१८ऊसतोड कामगार, मराठा आरक्षणावरून धनंजय मुंडे आक्रमक

ऊसतोड कामगार, मराठा आरक्षणावरून धनंजय मुंडे आक्रमक

Subscribe

ऊसतोड कामगार आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला जाब विचारला.

हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे दुष्काळाच्या प्रश्नावरून आक्रमक झालेले पाहायाला मिळाले. राज्यात दुष्काळी स्थिती गंभीर आहे. पण, कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जाग अाणण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी शेतकरी ३० ते ४० किलोमीटरचा प्रवास करत मुंबईमध्ये आला. आपल्या हक्कासाठी त्यांना दुसऱ्यांदा मोर्चा काढावा लागला. कर्जमाफीची घोषणा तर झाली पण, कर्जमाफी न मिळाल्यामुळं बळीराजा अस्वस्थ असल्याची टीका यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. सरकार केवळ आश्वासनं देत आहे. ६ महिन्यांमध्ये आश्वासनांची पूर्तता करू असं सरकारनं सांगितलं होतं. आज साडेपाच लाखे शेतकऱ्यांच्या वनपट्टा जमिनीचा निकाल लागला असता तर त्यांना मदत मिळाली असती. असं देखील यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे. आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं शेतकरी आणि आदिवासींमध्ये सरकारविरोधात चीड आहे. फसवी कर्जमाफी आणि दुष्काळामुळं शेतकरी आत्महत्या करत आहे. पण, ही परिस्थिती गांभीर्यानं घ्यायला सरकार तयार नाही. आत्तापर्यंत २६ हजार आत्महत्या झाल्या. पण, केवळ १३ हजार आत्महत्या अनुदानास पात्र झाल्याचं धनंजय मुंडे यांनी दिलं.

यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून देखील धनंजय मुंडे यांनी सरकारला जाब विचारला. आरक्षणासाठी ४१ जणांनी आत्महत्या केल्या. त्याचेच कुटुंबिय आज आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी बसले आहेत. सरकार मराठा आरक्षणाचा अहवाल सरकार पटलावर का ठेवत नाही? असासवाल देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षण देताना ते सर्वांच्या मतानं देण्यात यावा असं देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी मांडलं. दरम्यान, मराठा आरक्षणावरून झालेल्या गदारोळावरून विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -