उद्या आहे शनिश्चरी अमावास्या; पितरांच्या आशीर्वादासाठी करा ‘हे’ उपाय

हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा, अमावस्या, एकादशी, संकष्टी यांना खूप महत्तवपूर्ण मानले जाते. तसेच या दिवशी देवाची पूजा-आराधना, उपाय देखील केले जातात. पौर्णिमेप्रमाणेच अमावस्येचा दिवस देखील महत्त्वाचा मानला जातो. अमावस्येला देखील देवाची पूजा-आराधना करण्याचे विशेष लाभ होतात. 21 जानेवारी रोजी वर्षातील पहिली अमावस्या असणार आहे. शिवाय या दिवशी शनिवार असल्याने या अमावस्येला शनिश्चरी अमावस्या म्हटलं जाते. या दिवशी पितरांचे तर्पण करणं देखील शुभ मानलं जातं. तसेच श्री विष्णूंची देखील पूजा केली जाते.

शनिश्चरी अमावस्या तिथी
पंचांगानुसार, शनिश्चरी अमावस्या 21 जानेवारी सकाळी 6:17 पासून 22 जानेवारी रात्री 2:22 पर्यंत असेल.

शनिश्चरी अमावस्येला करा ‘हे’ उपाय

Shani Amavasya 2022: शनि अमावस्या के दिन इन राशियों पर जमकर बरसेगी शनि की कृपा, करियर और व्यापार में मिलेगी आशातीत सफलता | Shanichari Amavasya 2022 these zodiac sign can ...

  • शनिवारी अमावस्या असल्यास या दिवशी शनी देवाचे उपाय करणं फायदेशीर ठरु शकतं.
  • अमावस्येच्या दिवशी पिंपळाची पूजा करणं शुभ मानलं जातं. कारण पिंपळामध्ये त्रिमूर्तींचा वास असतो. शिवाय पिंपळाच्या पूजेने पितरांचा आशिर्वाद देखील प्राप्त होतो.
  • या दिवशी शनी देवांच्या मंदिरात जाऊन त्यांचे मनोभावे दर्शन घ्या आणि त्यांची पूजा करा.
  • या दिवशी पितरांचे आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी तर्पण आणि पिंडदान करावे.

हेही वाचा :

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय