घरभक्तीVastu Tips: पर्समध्ये चुकूनही ठेऊ नयेत या गोष्टी, नाहीतर व्हाल कंगाल

Vastu Tips: पर्समध्ये चुकूनही ठेऊ नयेत या गोष्टी, नाहीतर व्हाल कंगाल

Subscribe

पुरुष असो किंवा महिला पर्स प्रत्येकजण जवळ बाळगतात. पर्सपेक्षा सुरक्षित जागा कुठलीच नसल्याने पैसेच नाही तर घराची- गाडीची चावी, पावत्या अनेकजण पर्समध्ये ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये पैशांशिवाय इतर गोष्टी ठेवल्याने आर्थिक नुकसान होते. यामुळे पर्समध्ये पैसेच शिल्लक राहत नाहीत तर कधी कधी अचानक सुरू असलेले काम बंद होते. यामुळे वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये हे बघूया.

वास्तुच्या अनुसार पर्समध्ये कुठलीही चावी ठेवणे अशुभ मानले जाते. आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्समध्ये घराची, गाडीची, ऑफिसची चावी ठेवतो. पण पर्समध्ये धातूच्या वस्तुमुळे नकारात्मक उर्जा निर्माण होते.

- Advertisement -

वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये लक्ष्मीचा वास असतो. कारण त्यात आपण धनसंचय करतो. यामुळे पर्समध्ये मृत व्यक्तीचे फोटो ठेऊ नयेत. त्यामुळे नकारात्मकता निर्माण होते.

पर्समध्ये पावत्या, बिल ठेऊ नयेत. कारण ती कर्जाची आणि पैसे कमी झाल्याचे स्मरण करतात. यामुळे पर्समध्ये पैशांशिवाय काहीही ठेऊ नये.

- Advertisement -

फाटलेल्या डाग पडलेल्या नोटाही पर्समध्ये ठेऊ नयेत. तसेच देवी देवतांचे फोटो अनेकजण पर्समध्ये ठेवतात. पण तसे करु नये .

पर्समध्ये पैसे टिकवण्यासाठी चिमुटभर तांदूळ ठेवावेत.यामुळे पैसे खर्च होत नाहीत. बचत होते.

काहीजणांना पर्समध्ये औषध गोळ्या ठेवतात. वेळेप्रसंगी औषधे जवळ असावी हा यामागचा उद्देश असला तरी त्यामुळे नकारात्मक उर्जा आकर्षित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -