घरAssembly Battle 2022Uttarakhand Election 2022: मोफत सिलिंडर आणि नवीन नोकऱ्यांबाबत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी...

Uttarakhand Election 2022: मोफत सिलिंडर आणि नवीन नोकऱ्यांबाबत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची मोठी घोषणा

Subscribe

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला फक्त चार दिवस राहीले आहेत. मतदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी राजकीय पक्ष मोठ्या घोषणांसह आश्वासनं देत आहे. आज गुरूवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोफत सिलिंडर आणि नवीन नोकऱ्या देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. याशिवाय रोजगाराचा रोडमॅप कसा असेल. हे देखील त्यांनी सांगितलं आहे.

बनबासा येथील एका सभेदरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही ठरवले आहे. एका वर्षात तुम्हाला तीन सिलिंडर मोफत मिळतील. बेरोजगारांना दरमहा तीन हजार रूपये मिळणार असल्याचं आश्वासनं देखील त्यांनी दिलं. याशिवाय रिक्त असलेली २५ हजार शासकीय पदे सरकार आल्यानंतर तातडीने भरण्यात येणार असून २५ हजार जागांसाठी नवीन भरती करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

भाजपाने उत्तराखंडच्या निवडणुकीत जनतेला विश्वास दिलाय की, पुढच्या पाच वर्षांमध्ये पोलीस दलाला आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात येणार आहे. याशिवाय आरोग्य सेवा आणखी बळकट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत.

पीएम मोदींचा काँग्रेसवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी एका जनसभेला संबोधित केलं होतं. त्यावेळी देशाच्या सैनिकांप्रती काँग्रेसचा द्वेष कोणापासून लपलेला नाही, अशी खोचक टीका मोदींनी काँग्रेसवर केली. जनरल बिपीन रावत यांना देशातील पहिले सीडीएस बनवूनही काँग्रेसने बरेच राजकारण केले. तसेच काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना गुंडही म्हणण्यात आले होते, असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील ७० विधानसभा जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं पुढचं पाऊल काय?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : Goa Assembly Elections 2022: गोव्यात पुन्हा एकदा कमळ फुलणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -