Vastu Tips : घरामध्ये ‘या’ ५ फुलांची रोपटी असणं मानले जाते शुभ

अनेकजण घर बाहेरून सुंदर दिसावे यासाठी घराबाहेर वेगवेगळ्या प्रकारची सुंदर फुल झाडं लावतात. मात्र त्यांपैकी ही ५ फुलं झाडं तुमच्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहेत.

वास्तू शास्त्रामध्ये झाडं-रोपटी आणि फुलं यांच्याबाबत अनेक नियमांबाबत सांगण्यात आले आहे. वास्तू शास्त्रानुसार घराच्या आजूबाजूच्या परिसरात फुलांची रोपटी लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. शिवाय यामुळे घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते. फुलांच्या रोपट्यांमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेकजण घर बाहेरून सुंदर दिसावे यासाठी घराबाहेर वेगवेगळ्या प्रकारची सुंदर फुल झाडं लावतात. मात्र त्यांपैकी ही ५ फुलं झाडं तुमच्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहेत.

घरामध्ये ‘या’ ५ फुलांची रोपटी लावा अन् पाहा चमत्कार

 • चाफ्याचं रोपटं
  वास्तू शास्त्रानुसार, चाफ्याचं रोपट्याला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हे घरामध्ये लावल्याने दुःखाचे निवारण होते. हे रोपटं घरामध्ये उत्तर-दक्षिण दिशेला लावणं शुभ मानले जाते.
 • गुलाबाचं रोपटं
  गुलाबाचं रोपटं अनेकजण घरामध्ये आवडीने लावतात. वास्तूमध्ये देखील याचे महत्वाचे स्थान आहे. गुलाबाच्या रोपट्याला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. हे रोपटं घरामध्ये लावल्यास कुटुंबामध्ये प्रेम वाढते. शिवाय देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होतात.
 • पारिजातकाचे रोपटे
  पारिजातकाचे रोपटे घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावायला हवे, यामुळे घरामध्ये सुख-शांती येते. घरातील आर्थिक परिस्थिती देखील सुधारते.
 • कमळाचे फूल
  घरामध्ये कमळाचे रोपटे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते.
 • चमेलीचे रोपटे
  वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये चमेलीचे रोपटे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच यामुळे सुख-शांती टिकून राहते.

हेही वाचा :Vastu Tips : सकारात्मक ऊर्जेसाठी घरामध्ये ताज्या गुलाबाच्या पाकळ्या ठेवा अन् पाहा चमत्कार