घरताज्या घडामोडीअमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर एक अब्ज डॉलर्सचा सट्टा

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर एक अब्ज डॉलर्सचा सट्टा

Subscribe

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर जवळपास 1 अब्ज डॉलर्सचा (जवळपास 7450 कोटी रुपये) सट्टा लागला आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यावर अधिक लोक डाव लावत आहेत. ते सट्टेबाजांचे फेव्हरिट आहेत. अर्थात बायडन हेच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होतील, असे अधिकांश सट्टेबाजांना वाटते.

या निवडणुकीत एकीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. तर दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन हे आहेत. सट्टेबाज ज्यो बायडन यांच्या विजयावर अधिक सट्टा लावत आहेत. मतदानाला सुरुवात होईपर्यंत सट्टेबाजीची रक्कम 1.3 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जगभरात सर्वाधिक सट्टा फुटबॉलच्या सामन्यांवरच लागला होता. मात्र, यावेळची अमेरिकन निवडणूक हा रेकॉर्ड मोडीत काढू शकते. अमेरिकेबरोबरच इंग्लंड, न्यूझीलंड, कॅनडासारख्या अनेक देशांतून अनेक वेबसाइट्सच्या सहाय्यानेही लोक अमेरिकेतील निवडणुकीसाठी सट्टा लावत आहेत.

- Advertisement -

सट्टेबाजीनुसार, बायडन यांच्या विजयाची शक्यता 65 टक्के तर ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता केवळ 35 टक्केच आहे. याशिवाय, बीसीबेटर्स नावाच्या साइटवर 44 टक्के लोक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा एकदा विजयी होतील, यावर डाव लावत आहेत. तर 27 टक्के लोक बायडन हे विजयी होतील, असे म्हणत आहेत. अमेरिकेत या सट्टेबाजांची बोली म्हणजे मोठा संकेत मानला जातो. तेथील गत 50 वर्षांच्या सट्टेबाजीच्या इतिहासात सट्टेबाजांनी जे उमेदवार निवडून येतील, असे सांगितले, त्यापैकी प्रत्येक चारमधून तीन जणांचा विजय झाला आहे. अर्थात या सट्टेबाजांचा डाव 75 टक्के खरा ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -