घरताज्या घडामोडीvideo : पॅरासेलिंगमध्ये दोर तुटला, महिलांचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

video : पॅरासेलिंगमध्ये दोर तुटला, महिलांचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Subscribe

एखाद्या एडव्हेंचर स्पोर्टमध्ये जितकी मजा असते तितकाच धोकाही असतो. कधी कधी असे साहसी प्रकार अत्यंत जिवावर बेतणारे ठरू शकतात. हौस आणि मौजेला मोल नसते, पण अनेकदा ही बाब धोकादायकही ठरू शकते. अलिबागमध्ये पॅरासेलिंग करण्याचा थरार हा जिवावर बेतल्याचा अनुभव समोर आला आहे. पॅरासेलिंग करताना पॅराशूटचा दोर सुटला आणि काळजाचा ठोका चुकला. दोन्ही महिला काही काळ हवेतच लटकत राहिल्या. पण नशीब बलवत्तर म्हणून या महिलांना वाचवण्यात यश आले. मुंबईतील दोन महिला या लाईफ जॅकेट्समुळे बचावल्या. पण या साहसी पॅरासेलिंगच्या प्रकारात अशा प्रकारचा अपघात झाल्याने पुन्हा एकदा अशा एंडव्हेंचर खेळाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अलिबागच्या वरसोली समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली आहे.

मुंबईतील साकीनाका येथे राहणाऱ्या सुजाता नारकर आणि सुरेखा पाणीकर या दोन महिला गेल्या विकेंडला म्हणजे २७ नोव्हेंबरला अलिबागला विकेंड सेलिब्रेशनसाठी गेल्या होत्या. पण या विकेंड सेलिब्रेशनमध्ये दोघीही पॅरारायडिंग करताना थोडक्यात बचावल्या. सुरूवातीला हवेचा वेग कमी असल्याने पॅरासेलिंगसाठी अडचणी येत असल्याचे समोर आले होते. पण त्यानंतर मात्र अतिशय वेगाने या दोन्ही महिला हवेत भिरकावल्या. त्यामुळेच एका क्षणी सगळ अलबेल आहे असे व्हिडिओत दिसतानाच दुसऱ्या प्रसंगी मात्र दोन्ही महिलांना कनेक्टेड असणारा दोर तुटला आणि एकच पॅनिक निर्माण झाले. या प्रसंगात दोर तुटल्याने काही वेळ दोघीही हवेत राहिल्या, पण तितक्याच झपाट्याने खालीही आल्या. लाईफ जॅकेटमुळे सुदैवाने दोघीही बचावल्या. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

- Advertisement -

Adventurs करण्याच्या नादात जीव घातला धोक्यात | Parariding Viral Video

अनेकांना काही तरी अॅडवेंचर्स करण्याची भारी हौस असते. आणि हौसेला मोलं नसतं. मात्र ही मजा मस्ती एखाद्या व्यक्तीच्या जीवावर देखील बेतू शकते. अलिबाग येथील वर्सोलीमध्ये पॅराराईडींग करण्यासाठी उत्सुक असलेल्या दोन महिलांना पॅराराईडींग करणे चांगलचं महागात पडलंय.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, December 4, 2021

महिलांसोबत असणाऱ्या जीवरक्षकांनी दोन्ही महिलांना बचावण्यात यश मिळवले. महत्वाचे म्हणजे दोन्ही महिला या लाईफ जॅकेटमुळे बचावल्या. दोन्ही महिलांचा दोर तुटल्यानंतर जीवरक्षकांची बोट तत्काळ त्याठिकाणी पोहचली आणि महिलांना सुखरूप बाहेर काढले. पण या घटनेच्या निमित्ताने अशा साहसी क्रीडा प्रकारात सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे. या घटनेमध्ये झालेल्या चुकीमध्ये दोन्ही महिलांच्या हे जिवावरही बेतू शकले असते. प्रसंगावधान दाखवणाऱ्या जीवरक्षकांमुळे दोन्ही महिलांचा प्राण वाचला.

- Advertisement -

राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल होत आहेत. अशावेळी मुंबईनजीकच्या समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे समुद्र किनारे पाहता याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामध्येच पॅरारायडिंगच्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात अशा साहसी प्रकारात मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असतो. राज्यात अनेक ठिकाणी अशा साहसी खेळांसाठी आता पुढाकार घेण्यात येत आहे. त्यावेळीच पर्यटकांचीही तितकीच जबाबदारी आहे की खबरदारीचा उपाय म्हणून सर्व उपाययोजना तपासणे गरजेचे आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -