घरCORONA UPDATEAntibodies मुळे तयार होऊ शकतात शरिरात रक्ताच्या गुठळ्या, शास्रज्ञांचा अभ्यासात खुलासा

Antibodies मुळे तयार होऊ शकतात शरिरात रक्ताच्या गुठळ्या, शास्रज्ञांचा अभ्यासात खुलासा

Subscribe

कोरोनापासून वाचण्यासाठी तयार होणाऱ्या अँटिबॉडीज शरिरातील प्लेटलेट्सचे कार्य वाढवत आहेत. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शास्रज्ञ कोरोना विषयी अनेक नवे खुलासे करताना दिसत आहेत. कोरोनामुळे जगभरात लाखो जणांचे जीव गेले आहेत. कोरोना आपल्या फ्फुसांवर फार वाईट परिणाम करतो. कोरोनापासून वाचण्यासाठी कोरोना लस देण्यात येत आहे. लसीमुळे कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आपल्या शरिरात अँटिबॉडीज निर्माण होतात. या अँटीबॉडीज आपल्याला कोरोनाशी लढण्यासाठी मोठी मदत करतात. मात्र याच अँटिबॉडीविषयी शास्रज्ञांनी त्यांच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा केला आहे. कोरोनाच्या गंभीर प्रकरणात अँटिबॉडीजमुळे सूज येणे शरिरात रक्ताच्या गुठळ्या तयार होणे यासारखे प्रकार आढळून आले आहेत. या अँटिबॉडीज फ्फुसातील अनावश्यक प्लेटलेट्स अधिक सक्रिय करतात. ब्लड जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास असे म्हटले आहे की, कोरोनापासून वाचण्यासाठी तयार होणाऱ्या अँटिबॉडीज शरिरातील प्लेटलेट्सचे कार्य वाढवत आहेत. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटनच्या इंपीरियल कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी असे म्हटले आहे की, विविध औषधांनी सक्रिय अवयवांवर इलाज केले जातात त्यामळे प्लेटलेट्सची अशाप्रकारे कार्य करणे स्वाभाविक आहे. प्लेटलेस्ट्समध्ये असणाऱ्या रक्तातील लहान पेशी रक्तस्त्राव थांबवून रक्ताच्या गुठळ्या तयार करतात. मात्र असामान्य प्लेटलेट्स फंक्शनमुळे स्ट्रोक आणि ह्रदयविकाराच्या झटके यासारख्या गंभीर समस्या चिंतेचा विषय ठरला आहे.

- Advertisement -

ब्रिटन यूनिवर्सिटी ऑफ रिडींगचे अभ्यासक जॉन गिबिंसने यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत आमच्याकडे कोरोना संक्रमणादरम्यान रक्ताच्या गुठळ्यात गुंतलेले प्लेटलेस्ट्स सक्रिय का केले जात आहेत याविषयी केवळ गृहितक होती. मात्र आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी तयार होणाऱ्या अँटिबॉडीजमुळे शरिरात रक्ताच्या गुठळ्या होत असलेल्याचे समोर आले आहे.

संशोधकांनी कोरोनाच्या स्पाईक प्रोटीनशी लढण्यासाठी गंभीर कोरोना संक्रमित रुग्णांमधून अँटिबॉडीज घेतल्या आणि त्या प्रयोगशाळेत क्लोन केल्या. अभ्यासकांच्या अभ्यासातून असे समोर आले की, स्पाईक प्रोटीन कोरोना व्हायरस आणि मानवी पेशी संक्रमित करण्यास मदत करतो. अँटिबॉडीजच्या पृष्ठभागावर आढळणाऱ्या लहान शर्करा निरोगी व्यक्तींच्या अँटिबॉडीजपेक्षा वेगळ्या होत्या. जेव्हा निरोगी रक्तदात्याकडून घेतलेल्या रक्ताच्या पेशी प्रयोगशाळेत क्लोन करण्यात आल्या, अँटिबॉडीजची ओळख करण्यात आली तेव्हा प्लेटलेट्सच्या क्रियाशीलतेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हेही वाचा – India Corona Update: गेल्या २४ तासांत ४३,५०९ नव्या बाधितांची नोंद; रिकव्हरी रेट ९७.३८ टक्क्यांवर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -