घरमहाराष्ट्रWeather Alert : पुढचे ५ दिवस 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान...

Weather Alert : पुढचे ५ दिवस ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट

Subscribe

राज्यात पावसाने थोडी उसंती घेतली नाही तोवर काही जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील २४ तासांत राज्यातील किनारपट्टी भागांत मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. कोकणातही मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान पुढील ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई रायगड, पालघर, रत्नागिरी मुसळधार पावसाचा अंदाज घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे २९ जुलैपासून ते २ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे विश्रांती घेतलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय होताना पाहायला मिळणार आहे. कोकण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार तर ठाणे, पालघरमधील बऱ्याच भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. पुढील पाच दिवस पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई रायगड, पालघर, रत्नागिरी या भागातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

- Advertisement -


मुसळधार पावसामुळे कोकणाचे आधीच मोठी नुकसान झाले आहे. पावसाच्या सरी थोड्याथोड्या अंतराने पडत असल्या तरी त्यांचा जोर जास्त आहे. त्यामुळे पुढील काही दिवसं रत्नागिरी, रायगडमध्ये असाचं पाऊस पडत राहिल्यास होती नव्हती तेवढी सर्व शेती पाण्याखाली जाईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -