घरताज्या घडामोडीBreaking News: १२ मे पासून रेल्वे सुरु, ११ मे रोजी करा बुकिंग

Breaking News: १२ मे पासून रेल्वे सुरु, ११ मे रोजी करा बुकिंग

Subscribe

भारतात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून मागचा दीड महिना भारतातील रेल्वे सेवा बंद होती. मात्र आता १२ मे पासून रेल्वे सेवा सुरळीत सुरु होणार असून ११ मे रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने IRCTC च्या वेबसाईटवरून तिकीट बुकिंग करता येणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे, “त्यात त्यांनी म्हटले आहे की, रेल्वे हळुहळु पुर्वपदावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला देशातील मोठ्या शहरांमधून दिल्लीला जोडणाऱ्या १५ रेल्वे सुरु केल्या जातील. या रेल्वेचे बुकिंग ११ मे पासून सुरु करत आहोत.”

- Advertisement -

दिल्ली पासून आगरतळा, हावडा, पटना, बिलासपूर, डिब्रूगड, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुबंई, अहमदाबाद आणि जम्मू तवी अशा मोठ्या शहरांना जोडणाऱ्या काही ट्रेन विशेष ट्रेन म्हणून चालवल्या जाणार आहेत. या ट्रेन सुरु केल्यानंतर रेल्वेतर्फे इतर मार्गांवर देखील विशेष ट्रेन चालविल्या जातील. मात्र हे सर्व किती डबे रेल्वेला उपलब्ध होतात, त्यावर निर्भर आहे. कारण कोविड १९ च्या आयसोलेशन वॉर्डसाठी २० हजार डबे आरक्षित करण्यात आलेले आहेत. तसेच ३०० श्रमिक रेल्वे चालविण्यासाठी देखील काही डब्बे आरक्षित करण्यात आलेले आहेत.

 

- Advertisement -

रेल्वे पुन्हा सुरु करत असताना तिकीट विक्री ही ऑनलाईन होणार आहे. IRCTC च्या वेबसाईटवर ११ मे रोजी संध्याकाळी ४ वाजल्यापासून तिकीट बुकिंग करता येणार आहेत. रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडक्या बंद राहतील. प्लॅटफॉर्म तिकीट देखील याकाळात मिळणार नाही. तसेच रेल्वे स्टेशनवर फक्त अधिकृत कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश करण्याची परवानगी असेल. तसेच प्रवाशांना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. रेल्वे स्टेशनमध्ये येताना त्यांना स्क्रिनिंग करुन सोडले जाईल.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -