Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Coronavirus Live Update - ठाणे जिल्हयाची चिंता वाढली: कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा...

Coronavirus Live Update – ठाणे जिल्हयाची चिंता वाढली: कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा साडेपाच हजारावर!

Subscribe

ठाणे जिल्हयात रविवारी ३१९ नवीन रूग्णांची नोंद झाली त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ५ हजार ७०१वर पोहचला आहे. एकटया ठाण्यात १२७ नवीन रूग्ण आढळून आले,  त्यामुळे ठाण्याची रूग्ण संख्या २०१८ झाली आहे. जिल्हयात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

ठाण्यात रविवारी ९० रूग्ण हे उपचारानंतर बरे होऊन घरी परतले त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ७५६ झाली आहे. सध्या विविध रुग्णालयात ११९५ रूग्ण हे उपचार घेत आहेत. ठाण्यातील लोकमान्य सावरकरनगर परिसरात सर्वाधिक ३७ रुग्ण आढळून आले त्याखालोखाल नौपाडा कोपरी १५ रूग्ण, उथळसर प्रभागात १४ रूग्ण कळवा १३ रूग्ण तर वागळे, मुंब्रा, माजीवडा मानपाडा या परिसरात प्रत्येकी १२ रूग्ण सापडले. वर्तकनगरमध्ये ९ तर दिवा येथे एका रूग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत केडीएमसी हद्दीत रुग्णसंख्या ७७३ झाली असून त्यापैकी २७१ बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १६४१ रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी ७७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. मीराभाईंदर महापालिका हद्दीतही रूग्णांची संख्या ४९९वर पोहोचली आहे. त्यातील ३०३ रुग्ण बरे झाले आहेत तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये १९१ रुग्ण आहेत, त्यापैकी ३४ रुग्ण बरे झाले असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत ७८ रुग्ण असून त्यापैकी ३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये रुग्णसंख्या ६२ आहे त्यापैकी १८ बरे झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे बदलापूर मध्ये रुग्णांची संख्या वाढत असून हा आकडा १५८ वर पोहचला आहे. यापैकी ४६ रुग्ण बरे झाले आहेत तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे ग्रामीण परिसरात रुग्णांचा आकडा २७६ झाला असून त्यापैकी ४४ रुग्ण हे बरे झाले असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७२५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजार ३५९ झाल आहे. तर २४ तासांत मुंबईत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ९८८ झाला आहे.

- Advertisement -

 


- Advertisement -

धारावी आज २९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ५४१ झाला आहे.

  • आज माहिममध्ये कोरोनाच ११ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३१७वर पोहोचला आहे. तर दादरमध्ये आज कोरोनाचे ९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा २१९वर पोहोचला आहे.

राज्यात आज कोरोनाचेमुळे ५८ जणांचा बळी गेला आहे तर ३ हजार ४२ नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजार २३१ वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा १ हजार ६३५ झाला आहे.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ३०५४२ ९८८
ठाणे ४२०
ठाणे मनपा २५९० ३६
नवी मुंबई मनपा २००७ २९
कल्याण डोंबवली मनपा ८८९
उल्हासनगर मनपा १६९
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ८६
मीरा भाईंदर मनपा ४६४
पालघर ११४
१० वसई विरार मनपा ५६२ १५
११ रायगड ४१२
१२ पनवेल मनपा ३३० १२
ठाणे मंडळ एकूण ३८५८५ १११०
१३ नाशिक ११५
१४ नाशिक मनपा ११०
१५ मालेगाव मनपा ७११ ४४
१६ अहमदनगर ५३
१७ अहमदनगर मनपा २०
१८ धुळे २३
१९ धुळे मनपा ९५
२० जळगाव २९४ ३६
२१ जळगाव मनपा ११७
२२ नंदूरबार ३२
नाशिक मंडळ एकूण १५७० १०३
२३ पुणे ३४०
२४ पुणे मनपा ५०७५ २५१
२५ पिंपरी चिंचवड मनपा २६७
२६ सोलापूर २४
२७ सोलापूर मनपा ५७७ ३९
२८ सातारा २७९
पुणे मंडळ एकूण ६५६२ ३०९
२९ कोल्हापूर २३६
३० कोल्हापूर मनपा २३
३१ सांगली ६९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १५५
कोल्हापूर मंडळ एकूण ५०४
३५ औरंगाबाद २३
३६ औरंगाबाद मनपा १२३३ ४६
३७ जालना ५६
३८ हिंगोली ११२
३९ परभणी १७
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण १४४६ ४७
४१ लातूर ६७
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ३१
४४ बीड २६
४५ नांदेड १५
४६ नांदेड मनपा ८३
लातूर मंडळ एकूण २२६
४७ अकोला ३६
४८ अकोला मनपा ३६६ १५
४९ अमरावती १३
५० अमरावती मनपा १५५ १२
५१ यवतमाळ ११५
५२ बुलढाणा ४०
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ७३३ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४६४
५६ वर्धा
५७ भंडारा १०
५८ गोंदिया ३९
५९ चंद्रपूर १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली १३
नागपूर एकूण ५५६
इतर राज्ये /देश ४९ ११
एकूण ५०२३१ १६३५

मुंबईहून देशांतर्गत उड्डाणांसाठी दररोज २५ टेक ऑफ आणि २५ लँडिंग विमान करण्याची परवानगी देण्यास महाराष्ट्र शासनाने सहमती दर्शविली आहे. तसंच ही संख्या हळूहळू वाढवली जाईल. लवकर राज्य सरकार यासंदर्भात तपशील व मार्गदर्शक सूचना जारी करेल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

 


बँक ऑफ महाराष्ट्राने कृषी, बचत गट, किरकोळ, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) अंतर्गत मार्च २०२० ते मे २०२० दरम्यान जवळपास १ लाख लाभार्थींना २७८९ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.


ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरीही आजअखेर पर्यंत तब्बल २ हजार ७७ लोकांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. ही ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक बातमी आहे. नवजात बालकापासून ९१ वर्षांच्या आजीपर्यंतच्या रूग्णांचा यामध्ये समावेश आहे.

ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत तब्बल ३० हजार ३३४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील २२ हजार ९६२जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तर ५ हजार ३८८ जण कोरोनाग्रस्त झाले होते. आज अखेरपर्यंत १६३ जणांचे मृत्यू झाले असून ठाणे जिल्ह्यात ३ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हम होंगे कामयाब ही भावना ठेवून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली महसूल, आरोग्य, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद तसेच इतर सर्वच विभाग उपलब्ध सामग्री आणि मनुष्यबळ यांच्या आधारे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मर्यादित रहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कोरोना रुग्ण बरे होत असून काळजी करू नका, काळजी घ्या असा विश्वास जिल्हावासियांच्या मनात निर्माण करण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांचे सहकार्य आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न या बळावर कोरोना युद्ध जिंकणे सहज शक्य आहे असा विश्वास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे  पालन करावे. विनाकारण  घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.   कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्या परिसरात काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केले आहे.


२४ तासात ८७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह


देशांतर्गत विमान वाहतूक 25 मे पासून नियंत्रित पद्धतीनं सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. असं असलं तरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.


उल्हासनगरमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. उल्हाससनगरमध्ये कोरोनारूग्णांची संख्या १५० वर गेली आहे.


औरंगाबादमध्ये गेल्या २४ तासात  नवे २८ कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १२७६वर पोहचली आहे.


अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी मुंबईची लाइफलाइन म्हणजेच लोकल सेवा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.


मुंबईमध्ये दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये एक हजार ५६६ नव्या रूग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या २८ हजार ६३४ झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त मुंबई शहरात आहे. मागील २४ तासांत मुंबईमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या बळींची संख्या ९४९ वर गेली आहे.

- Advertisment -