घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत १०७ नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू!

Corona Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत १०७ नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू!

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १०७ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय २१ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या २०४३ झाली असून मृतांचा आकडा ११६ झाला आहे.

mumbai letter

- Advertisement -

वायसीएमओयूकडून 10 कोटींची मदत

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचे निश्चित केले आहे. ही माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. नुकतेच सामंत यांनी कोरोना या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांना मुख्यमंत्री सहायता निधीला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाप्रमाणे उर्वरित विद्यापीठांकडून देखील आपत्कालीन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूने आता चंद्रपुरातही शिरकाव केला आहे. आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण चंद्रपुरात सापडला नव्हता. मात्र, चंद्रपुरात पहिला कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ८१ वर गेली आहे.


आतापर्यंत धारावीत ६० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या आता ९७ वर गेली आहे. तर ८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर माहीम परिसरात बुधवारी तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून माहीम परिसरात कोरोनाच्या संख्या ९ वर गेली आहे. तर दादरमध्ये दोन नवे कोरोनाबाधित आढळले असून दादरमध्ये कोरोनाची संख्या २१ वर गेली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी लॉकडाऊन कोरोनावर उपाय नाही असं म्हटलं आहे. टेस्टींगची संख्येत वाढ करण्यात यावी. एका जिल्ह्यात किमान ३५० टेस्ट व्हाव्यात, असं राहुल गांधी यांनी सुचवलं आहे.


पुण्यातील ससून रुग्णालयात ६५ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात मृत्यूचा आकडा ४३ वर पोहोचला आहे.


परभणी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. हा तरुण पुण्याहून आला होता. परभणीच्या एमआयडीसीमध्ये हा तरुण राहत होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तरुणाला कोरोना झाल्याची माहिती दिली. परभणीत आतापर्यंत एकही रुग्ण नव्हता.


मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना पकडून पोलिसांनी कसरत करायला लावली. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील हा प्रकार आहे.


काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेणार आहेत. राहुल गांधी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


लॉकडाऊनमुळे पालघर मध्ये ५ घोड्यांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. पाचही घोडे टांग्यावाल्यांचे आहेत.


भारतात लॉकडाऊनचा आज २३ दिवस आहे. इतर देशांमध्ये एवढ्या दिवसांत कोरोना विषाणूने जो गुणाकार सुरु केला होता. तो सुदैवाने आपल्या देशात झालेला नाही. भारताची लोकसंख्या त्याची घनता पाहता आपण कोरोनाला अटकाव करण्यात अद्याप तरी यशस्वी झाले आहोत असेच म्हणावे लागेल. काल रात्रीपर्यंत भारतातील रुग्णांची संख्या १२,३७० एवढी होती तर मृतांची संख्या ४२२ होती. आतापर्यंत १,५०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -