घरCORONA UPDATEबाबो! आता अश्रूंमधूनही पसरतो कोरोना, संशोधकांचा धक्कादायक अहवाल

बाबो! आता अश्रूंमधूनही पसरतो कोरोना, संशोधकांचा धक्कादायक अहवाल

Subscribe

आपल्याला ताप किंवा सर्दी झाल्यास बऱ्याचदा आपले डोळे जळजळतात किंवा डोळ्यातून पाणी येते. डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यात कोरोना विषाणू असू शकतात आणि त्याचा संसर्ग होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरस आल्यापासून अनेक संशोधक त्यावर अभ्यास करत आहेत. आतापर्यंत कोरोनाविषयी अनेक नवीन खुलासे समोर आले आहेत. प्रत्येक वेळी नवे खुलासे सर्वांना अचंबीत करत आहेत. शिंकण्याने, खोकल्याने कोरोना व्हायरस पसरतो हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे कुठेही जाताना तोंडाला मास्क लावून बाहेर पडावे लागते. त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरस हवेतून पसरतो असेही सिद्ध झाले होते मात्र संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलेली अहवालाने सर्वांचींच झोप उडवली आहे. डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंमधून कोरोना व्हायरसचा संसर्ग होतो अशी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. (Covid 19 spreads through tears, the researchers’ shocking report)

अमृतसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने हे आगळे वेगळे संशोधन करुन Covid19 ची लागण झालेल्या रुग्णांच्या अश्रूंमधूनही कोरोना संसर्ग होतो असे म्हटले आहे. महाविद्यालयाच्या संशोधनात असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे की, शिंकल्या किंवा खोकल्याने त्यातून बाहेर येणारे द्रव बिंदू हे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याचे मुख्य कारण आहे. एखाद्या आजारात बऱ्याचदा डोळ्यांना त्रास होतो. ज्याला सायन्स टर्म मध्ये ऑक्युलर मॅनिफेस्टेशन असे म्हणतात. आपल्याला ताप किंवा सर्दी झाल्यास बऱ्याचदा आपले डोळे जळजळतात किंवा डोळ्यातून पाणी येते. डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यात कोरोना विषाणू असू शकतात आणि त्याचा संसर्ग होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोना व्हायरस डोळ्यातील पाण्यातून पसरु शकतो याचा अभ्यास करण्यासाठी दोन गटात अभ्यास करण्यात आला. पहिल्या गटात १२० कोरोना बाधित रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. १२० रुग्णांपैकी ६० जणांना डोळ्यांचे विविध आजार झाले तर ६० जणांना काहीच झाले नाही. तर दुसऱ्या गटात ५२ टक्के रुग्णांना मध्यम स्वरुपाचा आजारात झाला तर ४८ टक्के लोकांना गंभीर स्वरुपाचा संसर्ग झाला होता. यातील १७.५ टक्के रुग्णांची RTPCR चाचणी करुन अश्रूंचे नमुने तपासण्यात आले त्यातील ते नमुने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात त्यांना आणखी एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे अश्रूंची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या १७.५ टक्क्यांतील ९.१६ टक्के रुग्णांना डोळ्यांचे त्रास जाणवत होते. तर ८.३३ टक्के रुग्णांना डोळ्यांचा कोणताही त्रास झाला नव्हता. त्यामुळे डोळ्यांचे कोणतेही आजार नसलेल्या लोकांना देखील अश्रूंमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो हे समोर आले.

- Advertisement -

हेही वाचा – covid-19 ची वाढणारी R Value म्हणजे काय? AIIMS च्या प्रमुखांनी देशासाठी काय दिलाय इशारा ?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -