घरCORONA UPDATEcovid-19 ची वाढणारी R Value म्हणजे काय? AIIMS च्या प्रमुखांनी देशासाठी काय...

covid-19 ची वाढणारी R Value म्हणजे काय? AIIMS च्या प्रमुखांनी देशासाठी काय दिलाय इशारा ?

Subscribe

कोरोनाची R वॅल्यू वाढली म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये कोरोना संक्रमणाचा प्रसार वाढला आहे.

देशात दररोज जवळपास ४० हजारांहून अधिक बाधित रुग्णांची (Covid19 Positive Patients) नोंद करण्यात येत असून त्यातील ५० टक्के रुग्ण हे एकट्या केरळ राज्यातील आहेत. कोरोनाच्या या वाढत्या संक्रमणामुळे कोरोना ( Covid19)  संक्रमाणाची R वॅल्यू (R Value)  वाढली आहे.  याबाबत दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदिप गुलेरिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारतात कोरोना संक्रमाणाची R वॅल्यू वाढत असून हा देशासाठी चिंतेचा विषय आहे. देशातील ज्या राज्यात कोरोना संक्रमण वाढत आहे त्या ठिकाणी योग्य धोरणांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.covid-19 ची वाढणारी R Value म्हणजे काय? AIIMS च्या प्रमुखांनी देशासाठी काय दिलाय इशारा? जाणून घ्या.  (What is the R value of Corona? AIIMS chief Dr Randeep Guleria warns india to increasing R value of covid-19 )

 

- Advertisement -

कोरोनाची R Value म्हणजे काय?

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला कोरोनाची R वॅल्यू असे म्हणतात. एक कोरोना संक्रमित व्यक्ती जितक्या लोकांना संक्रमित करतो त्याला R वॅल्यू असे म्हणतात. जर एक व्यक्ती एका व्यक्तीला संक्रमित करत असले तर त्याची R वॅल्यू १ होणार मात्र जर एक व्यक्ती २ लोकांना संक्रमित करत असेल तर त्याची R वॅल्यू २ होते. देशात कोरोना संक्रमणाची R वॅल्यू वाढत असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाची R वॅल्यू ०.९९ इतकी आहे. कोरोनाची R वॅल्यू वाढली म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये कोरोना संक्रमणाचा प्रसार वाढला आहे.

AIIMS च्या प्रमुखांनी दिला इशारा 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाविषयी लोक ज्या प्रकारे निष्काळजीपणा दाखवत आहे ते पाहता कोरोनाची तिसरी लाट येण्यास फार काळ लागणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार गोवर आणि कांजण्या या आजाराची आर वॅल्यू ८ हून अधिक होती. त्यामुळे एका घरात एका व्यक्तीला हा आजार झाला तर घरातील इतर व्यक्तीही या आजाराचे बळी पडतात. कोरोनाबाबतीतही आता असाच प्रकार घडत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे संपूर्ण कुटुंब संक्रमित झाल्याचे आपण पाहिले आहे. गोवर आणि कांजण्या या आजारातही असाच प्रकार समोर आला होता. येत्या काळात कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटच्या संक्रमाणामुळे देखील एका वेळी संपूर्ण कुटुंब संक्रमित होण्याची शक्यता असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले.

- Advertisement -

डॉ. गुलेरिया यांचे म्हणण्यानुसार, सर्वाधिक कोरोना संक्रमित ठिकाणी ट्रिपल टी टेस्ट, ट्रॅक आणि ट्री सारखी धोरणे राबवण्यावर काम करावे लागले तरच कोरोनाची ही साखळी आपण तोडू शकतो. कोरोना संक्रमणाचा ग्राफ अशाच प्रकारे वाढत राहिला तर येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण ४६ जिल्ह्यात कोरोनाची संक्रमणाचा दर २ टक्क्यांनी वाढला आहे तर देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर ५ ते १० टक्क्यांनी वाढला आहे.

केरळमध्ये २४ तासात २० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

केरळमध्ये कोरोना संक्रमणाचा दर वाढला असून दररोज ५० टक्के नवे बाधित रुग्ण केरळ राज्यात आढळून येत आहेत. गेल्या २४ तासात केरळ राज्यात २० हजार ७२८ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर केरळमध्ये सध्या १ लाख ६७ हजार ३७९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील बाधितांचा विचार केला असता गेल्या २४ तासात देशात ४० हजार १३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून ४२२ रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना देशातील काही राज्यातील कोरोना संक्रमणाचा धोका अचानक वाढल्याने अनेक राज्यांना सरकारने अलर्ट जारी केला आहे.


हेही वाचा – जीवघेण्या डेल्टा व्हेरियंटची १३२ देशांमध्ये दहशत; २९ देशांमध्ये ऑक्सिजनची कमतरता – WHO

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -