पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांची बदली

पनवेल मेट्रो सेंटरला उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

dattatray navale prantadhikari panvel transfer to panvel Deputy Collector to Metro Center
पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांची बदली

पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांची बदली झाली असून पनवेल मेट्रो सेंटरला उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना नवी नियुक्ती देण्यात आली आहे. कार्यक्षम कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या नवले पावणेचार वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांची पनवेल मेट्रो सेंटरला उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. पावणेचार वर्षांपूर्वी पनवेल प्रांताधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर दत्तात्रेय नवले यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे कामे पार पाडली आहेत. वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन त्यांच्या कार्यकाळामध्ये करण्यात आले. या व्यतिरिक्त पनवेल विधानसभा मतदार संघाचे ते निवडणूक निर्णय अधिकारी होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रक्रिया अत्यंत आणि ग्रामपंचायत निवडणुकासुद्धा त्यांच्या कार्यकाळात झाल्या.

कोरोना वैश्विक संकटात सर्व यंत्रणांना सोबत घेऊन पनवेल आणि उरणच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे संक्रमण होणार नाही, याची खबरदारी प्रांताधिकारी म्हणून नवले यांनी घेतली. पनवेल महापालिका आणि रायगड जल्हाधिकारी कार्यालयाशी योग्य समन्वय ठेवून त्यांनी कोरोना काळातील परिस्थिती हाताळली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार देण्याच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी म्हणून विशेष प्रयत्न केले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणातही दत्तात्रेय नवले यांनी योग्य समन्वय ठेवला. त्यामुळे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात लसीकरण करता आले. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करुन घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकप्रतिनिधींबरोबर उत्तम संपर्क ठेवून दत्तात्रय नवले यांनी काम केले. याशिवाय ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत दाखल झालेले दाव्यांचा योग्य निपटारा करून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे.

निसर्ग चक्रीवादळात देखील नवले यांनी पनवेल, उरण तालुक्यात या दोन तालुक्यात नुकसानग्रस्तांना मदत पोहोचविण्यास कार्यतत्परता दाखविली. तसेच वादळात झालेल्या युद्धपातळीवर नुकसानाचा आढावा घेण्यास देखील नवले आघाडीवर होते. कोविड १९ आणि निसर्ग वादळाच्या कार्यकाळात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडल्याने प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांचा हा सत्कार करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला होता.


हेही वाचा – राहुल गांधींनी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला तो पक्ष रसातळाला गेला हा इतिहास, राणेंचा टोला