घरताज्या घडामोडीपनवेल मालमत्ता करासंबंधी तोडगा काढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

पनवेल मालमत्ता करासंबंधी तोडगा काढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

Subscribe

पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करातील त्रुटी दूर करून जनतेला दिलासा देण्याच्या मागणीसाठी पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागितली. यावेळी लवकरच याप्रश्नी चर्चा करून तोडगा काढण्याचे पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता करासंदर्भात बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांनी महाविकास आघाडीच्या ७०% करात सूटच्या मागणीला सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या दुटप्पी धोरणाचा फटका येथील नागरिकांना बसत असल्याची तक्रार शिष्टमंळातून करण्यात आली. कराची रक्कम कमी करावी अशी मागणी विरोधी पक्षांची असल्याचे उपस्थितांनी पवार यांनी अवगत केले. मात्र सत्ताधारी याला जुमानत नाहीत. एलबीटी कर माफ केला जातो, मात्र करामध्ये नागरिकांना अधिकची सवलत दिली जात नाही. यासाठी विरोधी पक्षाने वेळोवेळी चर्चा व आंदोलने केली. या सार्‍यांची माहिती प्रितम म्हात्रे यांनी बैठकीत दिली. यावेळी पवार यांनी मंत्री जयंत पाटील, आदीती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार बाळाराम पाटील यांच्यासोबत चर्चा करून पुढे काय करायचे आहे ते ठरवणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक गणेश कडू व इतर उपस्थित होते.

- Advertisement -

या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रशांत पाटील, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे सुदाम पाटील, शिवदास कांबळे तसेच पनवेल-उरण महाविकास आघाडीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालिकेने करामध्ये आणखी सूट द्यावी, यासाठी आम्ही वेळोवेळी चर्चा व आंदोलने केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सर्व माहिती दिली आहे. त्यांनी ७० टक्के करातील सूटच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
-प्रितम म्हात्रे, विरोधी पक्ष नेता, पनवेल महानगरपालिका

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -