घरताज्या घडामोडीनवी मुंबईतील विभागीय क्रीडासंकुल माणगावमधील नाणोरेत ; शहरातील खेळाडूंचे स्वप्न भंगले

नवी मुंबईतील विभागीय क्रीडासंकुल माणगावमधील नाणोरेत ; शहरातील खेळाडूंचे स्वप्न भंगले

Subscribe

अद्यापही एकाही राजकीय पक्षाने यावर आवाज उठवलेला नाही.

नवी मुंबईमधील बालेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोकण विभागीय क्रिडासंकुल उभारण्यात येणार होते. हे क्रिडासंकुल माणगावमधील नाणोरेमध्ये हलविण्यात येत आहे. नवी मुंबईत जागेअभावी या क्रिडासंकुलाची उभारणी नाणोरेत करण्यात येत आहे. त्यामुळे या शहरात असणाऱ्या खेळाडूंमध्ये असंतोष निर्माण झाली आहे.

राज्यसरकारने सन १९९६ मधील क्रीडा धोरणाची फलश्रुती व क्रीडा विकासाची दिशा लक्षात घेऊन नवीन क्रीडा धोरण सन २००१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. सन २००१ च्या क्रीडा धोरणात सर्वांसाठी खेळाद्वारे सुदृढता हा केंद्रबिंदू ठरवण्यात आला होता नागरिकांमध्ये शारीरिक सुदृढता आणि याद्वारे आरोग्यसंपन्न कार्यक्षम जीवनाचे महत्व त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना या क्रीडा धोरणात सुचविण्यात आली होती. त्यानंतर तालुका, जिल्हा, आणि विभागीय क्रिडासंकुल उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यात मुंबईसह एक विभागीय क्रिडासंकुल आणि कोकण विभागासाठी स्वतंत्र क्रिडासंकुल उभारण्याचे ठरवण्यात आले होते. सिडको आणि महानगरपालिका प्रशासन नेहमीच नवी मुंबई हे शहर सुनियोजित असून, प्रत्येक नोडमध्ये मैदानासाठी भूखंड आरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र डी.वाय पाटील समूहाचे क्रिकेट मैदान वगळता दुसरे कोणतेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडासंकुल येथे नाही. मात्र कोकण विभागासाठी उभारण्यात येणारे नवी मुंबईच्या क्रिडासंकुलासाठीच्या जागेसंदर्भात न्यायालयीन प्रकरण सुरु आहे.

- Advertisement -

मार्चमध्ये सरकारने नवी मुंबईतील क्रिडासंकुल रद्द करुन माणगावमधील नाणोरेत हलविण्याचा निर्णय घेतला मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे अद्यापही एकाही राजकीय पक्षाने यावर आवाज उठवलेला नाही. परंतु माणगाव-नाणोरे येथे उभारण्यात येणारे हे विभागीय क्रीडा संकुल कोकणातील खेळाडूंसाठी माइल स्टोन ठरणार असल्याचा विश्वास रायगडच्या पालकमंत्री तथा क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. कोकण विभागाचे विभागीय क्रीडा संकुल नवी मुंबई येथे उभारण्यात येणार होते. परंतु नवी मुंबई परिसरात या संकुलासाठी आवश्यक सरकारी जमीन उपलब्ध झाली नाही. त्यानंतर विभागीय क्रीडा संकुल हे कोकणाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे असल्याचे मत तटकरे यांनी मांडले होते. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नाणोरे येथील स.नं.१३०/० मधील १०.०० हेक्टर (२४ एकर) सरकारी जमीन विभागीय क्रीडा संकुल, कार्यकारी समिती, मुंबई विभागाच्या नावावर करण्यात आली आहे. या संकुलासाठी त्र्याऐंशी कोटी चव्वेचाळीस लाख सोळा हजार रुपयांच्या अंदाजपत्रक आणि आराखड्यास सरकारने मान्यता दिली आहे.

खेळाडूंचे स्वप्न भंगले

भारतात क्रिकेट हा क्रिडाप्रकार सोडला तर, इतर क्रीडा प्रकारांना दुर्लक्षित केले जाते. सचिन तेंडूलकर, महेंद्र धोनी सारख्या क्रिकेटपटूना मोठमोठया कंपन्याना प्रायोजकत्व देणार. पण जे धावपटू आहेत खेळाडू आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. रायगड जिल्ह्याचे जे क्रीडा संकुल आहे तिथे जेल होते, मतमोजणी होते यासारखे दुर्दैव नाही. अशा परिस्थितीत ऑलम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा काय करणार? जे ग्रामीण भागातील तरुण आहेत. जे डोंगरदर्‍यात धावपळ करीत असतात त्यांना धावपटू केले त्यांना प्रशिक्षण दिले तर अनेक पदके आपल्याला मिळू शकतात. शहरात क्रीडासंकुल नसल्याने खेळाडूंचे स्वप्न भंगले आहे.

- Advertisement -

क्रिडासंकुलामध्ये ‘ या ‘ सुविधांचे नियोजन

माणगावमधील नाणोरे विभागीय क्रिडासंकुलामध्ये अनेक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अॅथलेटिक्स पॅव्हेलियन बिल्डिंग , ४०० मीटर लांबीचा सिंथेटीक रनिंग ट्रॅक, फुटबॉल मैदान, चेंजिग रुम, हॉकी मैदान, बास्केटबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, हॉलीबॉल क्रिडासंकुल याशिवाय आऊटडोअर गेम, अंतर्गत रस्ते ,इनडोअर हॉल, डायव्हींग तलाव, जलतरण तलाव या सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा – दिल्ली विमानतळाला बॉम्बने उडवणार ; अल कायदाच्या नावे मेल, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -