घरताज्या घडामोडीमुलींच्या स्वरक्षणार्थ "गुलाबी गॅंग" संस्थेची स्थापन

मुलींच्या स्वरक्षणार्थ “गुलाबी गॅंग” संस्थेची स्थापन

Subscribe

आमदार सौ. मनिषाताई चौधरी यांच्या संकल्पनेने डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, एन. जि. ओ. यांच्या सहकार्याने "गुलाबी गॅंग" नावाची मुलींच्या स्वरक्षणार्थ आणि प्रबोधनार्थ संस्था स्थापन केली आहे.

शहरात मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रोज वेगवेगळ्या घटना कानावर येतात. यामुळे मोठ्याप्रमाणावर नाहक बळीही जातात. महिलांवरील अत्याच्याराच्या या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी वेगवेगळ्या शिबीरांचे आयोजन केले जाते. मुलींना स्परक्षणासाठी कराटे, बॉक्सिंग किंवा मार्शल आर्टचे शिक्षण दिले जाते. मात्र तरीही या घटनांचे प्रमाण कमी झालेले नाही.

आमदार सौ. मनिषाताई चौधरी यांच्या संकल्पनेने डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, एन. जि. ओ. यांच्या सहकार्याने “गुलाबी गॅंग” नावाची मुलींच्या स्वरक्षणार्थ आणि प्रबोधनार्थ  केली आहे. १३ फेब्रुवारी २०२० रोजी बोरिवली येथील सेंट रॉक कॉलेजआणि दहिसर येथील मातृछाया कॉलेज मध्ये संपन्न झाला. त्यात मुला मुलींची पथनाट्य तसेच महिला सशक्तीकरण याविषयावर मान्यवरांनी आणि आमदार सौ. मनिषाताई चौधरी यांनी सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी मुला मुलींनी मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तसेच सर्वच स्तरातून या संस्थेला पंसती मिळाली आहे.

- Advertisement -

तसेच जर उत्तर मुंबई मध्ये महिलांच्या बाबत कोणतीही अपरिहार्य घटना घडली तर १०३ टोल फ्री संकेतस्थळावर आपण संपर्क साधून तेथील गुलाबी गॅंगच्या मदतीने आपण आपले रक्षण करू शकता. सगळ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -