घरCORONA UPDATELive Update: हाथरस प्रकरण; योगी आदित्यनाथ यांनी SP, DSP, Inspector यांना निलंबित...

Live Update: हाथरस प्रकरण; योगी आदित्यनाथ यांनी SP, DSP, Inspector यांना निलंबित करण्याचे दिले निर्देश

Subscribe

हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसपी, डीएसपी, इन्स्पेक्टर आणि काही इतर अधिकाऱ्यांना प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारे निलंबित करण्याचे निर्देश दिल्याचे समोर आले आहे. 

https://twitter.com/ANI/status/1312049425934479360

- Advertisement -

राज्यात २४ तासांत आढळले १५,५९१ नवे रुग्ण, ४२४ जणांचा मृत्यू!

गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ५९१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२४ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख १६ हजार ५१३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३७ हजार ४८० जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -


मुंबईत आज दिवसभरात २,४४० नव्या रुग्णांची वाढ, ४२ जणांचा मृत्यू

मुंबईत आज दिवसभरात २ हजार ४४० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालई आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ९ हजार ९३४ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९ हजार ११ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.


राज्यात २४ तासांत आढळले १४१ पोलीस कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू

गेल्या २४ तासांत राज्यात १४१ पोलीस कोरोनाबाधित आढळले असून एका जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २३ हजार ६८९वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २४८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २० हजार ६०५ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २ हजार ८३६ पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.

 


दिल्ली: महर्षि वाल्मीकी मंदिरात हाथरस घटनेतील पीडित मुलीच्या प्रार्थना सभेत कॉंग्रेस नेते प्रियांका गांधी वड्रा हजर राहिल्या आहेत.


देशासह राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरूच आहेत. दिवसेंदिवस वाढणारा बाधितांचा आकडा हा चिंताजनक असून कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाहीये. मुंबईतही गेल्या २४ तासांत २ हजार ३५२ नवे रुग्ण आढळले असून ४३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ७ हजार ४९४ वर पोहोचला आहे. दरम्यान नवी मुंबईत आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. ११ ठिकाणी हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


मुंबई पोलिसांनी पायल घोषला वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात नेले

गुरुवारी वर्सोवा पोलिस स्टेशनच्या टीमने अभिनेता पायल घोष याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करणार्‍या अभिनेता पायल घोषला या प्रकरणी वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईच्या अंधेरी येथील सरकारी रुग्णालयात नेले. तर अभिनेता पायल घोष यांच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यप मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया कोरोनो पॉझिटिव्ह

जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असून कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिका या देशाला बसला आहे. मात्र आता हा जीवघेणा कोरोना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी अर्थात व्हाइट हाऊस येथे पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे. दोघांचेही नमुने घेण्यात आले असून कोरोना रिपोर्ट यायचे बाकी होते आणि त्याचे रिपोर्ट आले असून दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.


देशात गेल्या २४ तासात नाही तर आतापर्यंत ५३ लाख ५२ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज

देशात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६३ लाख ९४ हजार ०६९ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत ८१ हजार ४८४ रुग्णांची वाढ झाली असून १ हजार ०९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात आता ९ लाख ४२ हजार २१७ इतके अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ इतक्या जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ९९ हजार ७७३ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे, ही माहिती आरोग्य मंत्रालायने दिली.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया क्वारंटाइन

जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असून कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिका या देशाला बसला आहे. मात्र आता हा जीवघेणा कोरोना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी अर्थात व्हाइट हाऊस येथे पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे. दोघांचेही नमुने घेण्यात आले असून कोरोना रिपोर्ट यायचे बाकी आहेत. (सविस्तर वाचा)


ठाणे पश्चिमेकडील हिरानंदानी इस्टेटमधील आर्केडिया शॉपिंग सेंटरमध्ये आज सकाळी आग लागली. आपत्ती एमजीएमटी सेंटर आणि अग्निशमन दलासह अग्निशमन इंजिन व पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाचे कार्य सुरू आहे.


देशात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोना चाचण्यांमध्ये देखील वाढ होत आहे. गेल्या २४ तसात गुरूवारी १० लाख ९७ हजारांहून कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहे तर आतापर्यंत एकूण ७ कोटी ६७ लाख १७ हजार ७२८ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती ICMR ने दिली आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. (सविस्तर वाचा)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त रोजी सकाळी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.


गांधी जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही महात्मा गांधी यांचा एक दुर्मिळ फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.


 

राज्यात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १६ हजार ४७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १४ लाख ९२२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३७ हजार ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -