घरताज्या घडामोडी१ जानेवारीपासून लोकल सुरू होण्याची शक्यता!

१ जानेवारीपासून लोकल सुरू होण्याची शक्यता!

Subscribe

राज्यात तसेच मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात येतेय. त्यामुळे आता दुसरी लाट येण्याची शक्यता मावळली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकलसेवा सुरू होण्यामध्ये काही अडथळे असतील असे वाटत नाही. 31 डिसेंबरनंतर जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून मुंबईतील लोकलसेवा सुरू होण्याची शक्यता आहे, असे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचार्‍यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.

- Advertisement -

यानंतर, राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलत सामान्य महिलांसाठी लोकलचा प्रवास सुरू करून नवरात्रोत्सवाची भेट दिली. मात्र, लोकलने प्रवास करण्याच्या वेळेची मुभा फारशी उपयोगी नसल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली होती. तर, सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्यासाठी ही एक प्रकारची चाचणी असल्याचे बोलले जाऊ लागले होते.

दिवाळीनंतर राज्य सरकार मुंबईकरांना दिलासा देऊ शकते अशी शक्यता होती. मात्र, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचं संकट व वाढती रुग्णसंख्या यामुळे लोकलसेवेसाठी सामान्यांना प्रतीक्षा पाहावी लागली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -