घरताज्या घडामोडीLive Update: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पार पडली

Live Update: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पार पडली

Subscribe

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पार पडली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृह इथे पार पडली. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, पालकमंत्री व संपर्कमंत्री यांच्या कामाबाबतचा आढावा तसेच पक्षसंघटना बळकट करण्यासाठीच्या ध्येयधोरणांवर साधकबाधक चर्चा बैठकीत करण्यात आली.

- Advertisement -

Mumbai Corona Update : मुंबईत ३२३ कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या २४ तासात १ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

२४ तासात बाधित रुग्ण – ३२३

- Advertisement -

२४ तासात बरे झालेले रुग्ण – २७२

बरे झालेले एकूण रुग्ण – ७२२६२१
बरे झालेल्या रुग्णांचा दर -९७%

एकूण सक्रिय रुग्ण- ३१०६

दुप्पटीचा दर- १५११ दिवस
कोविड वाढीचा दर (२४ ऑगस्त ते ३० ऑगस्त)-०.०५%


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहेत. राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी नेते राज्यापालांशी चर्चा करणार आहेत.


हवाई दलाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा, भारतीय हवाई दलाच्या ७५ विमानांचा इलिफंट वॉक


आज ठाण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कायमस्वरुपी ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले.


चाळीसगाव तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पुरात ५-६ जण वाहून गेल्याची भिती आहे. त्याचप्रमाणे जवळपास ८०० हून अधिक जनावरे वाहून गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.


ज्या दिवशी हल्लेखोर पोलिसांच्या तावडीतून सुटेल त्यादिवशी मनसेकडून मार खाणार. ठाणे मनपाच्या महिला अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याविरोधात राज ठाकरे आक्रमक


सरकार सोयीनुसार नियम लावत आहेत. हे घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात तर आम्ही काय करायचे? मंदिरे उघडली नाही तर मनसे घंटानाद आंदोलन करेल – राज ठाकरे


मनसे कार्यकर्त्यांना दहीहंडी साजरी करण्याचे आदेश मीच दिले होते. गेल्या वर्षीची परिस्थिती आणि यंदाच्या परिस्थितीत खुप फरक आहे. नियम लावयाचे आहेत तर सर्वासाठी एक नियम लावा. शिवसेना विरोधी पक्षात असती तर काय केले असते. – राज ठाकरे


परिवहन मंत्री अनिल परब आज ईडी कार्यलयात हजर राहणार नाही. मंत्री असल्यामुळे आजचे कार्यक्रम अगोदरच ठरले असून ते रद्द करता येणार नसल्याचे अनिल परब यांनी पत्राद्वारे ईडीला कळवले आहे. ईडीने परब यांचे पत्र स्वीकारले असून अनिल परब यांना वेळ द्यायचा की, त्यांना दुसरे समन्स काढायचे या विचारात ईडीचे अधिकारी आहेत.


 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी १२ वाजता कृष्णकुंजवरुन माध्यमांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे दहीहंडीच्या मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मुंबईत आज अनेक ठिकाणी मनसे नेत्यांनी निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली. त्यामुळे पोलिसांनी मनसे नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर राज ठाकरे वक्तव्य करण्याची शक्यता आहे.


 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काळाचौकी मैदानात निर्बंध मोडून दहीहंडी फोडल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.


 

बाळा नांदगावकर यांनी मुंबईतील काळाचौकी मैदानात दहीहंडी फोडली


 

मनसे नेते बाळा नांदगावकर काळाचौकी मैदानात दहीहंडीसाठी दाखल झाले असून हंडी फोडण्यासाठी मनसे कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे.  पोलिसांना त्यांचे काम करु द्या. आम्ही दहीहंडी फोडणारच. नोटीसा आल्या तरी सण साजरे होणार असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.


नोटीसा आल्या तरी सण साजरे होणार – बाळा नांदगावकर


साकीनाक्यात दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिस आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आले.


ठाण्याच्या भगवती मैदानात दहीहंडीचे आयोजन.दहीहंडी फोडण्यासाठी मनसे कार्यकर्त जमा होण्यास सुरुवात झाली आहे.


औरंगाबादच्या कन्नड घाटात मुसळधार पावसामुळे ३ ठिकाणी दरड कोसळली आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास औरंगाबाद-धुळे महामार्ग बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. संपूर्ण महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.


अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य माघारी फिरले असल्याची माहिती पेंचागॉनकडून देण्यात आली असून
सी-१७ विमान हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी रवाना करण्यात आले.


 

परिवहन मंत्री अनिल परब यांना आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस.  अनिल परब ईडीसमोर हजर राहणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


 

विदर्भाच्या पश्चिम भागांवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मुंबई आणि उपनगरात देखील पुढील २४ तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


मुंबईत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.


 

राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा कोसळण्यास सुरुवात केली आहे. छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पूर्व पश्चिमेकडून असे वारे वाहू वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे राज्यात पुढील ३-४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -