Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: राज्यात गेल्या २४ तासात ४ हजार ५७ कोरोनाबाधितांची नोंद

Live Update: राज्यात गेल्या २४ तासात ४ हजार ५७ कोरोनाबाधितांची नोंद

Related Story

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासात ४ हजार ५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ५ हजार ९१३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर ६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


२४ तासात बाधित रुग्ण -४९६ २४ तासात बरे झालेले रुग्ण -२३७ बरे झालेले एकूण रुग्ण -७२४०७७ बरे झालेल्या रुग्णांचा दर -९७% एकूण सक्रिय रुग्ण-३८१५ दुप्पटीचा दर -१३६३ दिवस कोविड वाढीचा दर (२९ ऑगस्त ते ४ सप्टेंबर)-०.०५%

- Advertisement -


मुख्यमंत्र्यांचे राजू शेट्टींना बैठकीचं निमंत्रण
राजू शेट्टींच्या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल
राजू शेट्टींना नृसिंहवाडीत प्रांताधिकाऱ्यांनी दिलं प्रस्तावाचं पत्र
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टींचे आंदोलन
पुरावर कायमस्वरुपी उपाययोजना गरजेची – राजू शेट्टी


- Advertisement -

स्वाभीमानीचं जलसमाधी आंदोलन, पोलिसांची नजर चुकवत कार्यकर्त्यांच्या नदीपात्रात उड्या

कृष्णा नदीत स्वाभीमानी जलसमाधी आंदोलन करण्यात येत असून कार्यकर्ते नदीपात्रात उड्या घेत आहेत. कृष्णा नदी पात्रात रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली असून परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

राजू शेट्टींची पदयात्रा नृसिंहवाडीच्या दिशेनं


भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना कोरोनाची लागण
बॉलिंग कोच बी. अरुण यांनाही कोरोनाची लागण
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांनाही कोरोनाची लागण
सर्वांना विलगीरकरणात ठेवण्यात आलं आहे.


पुण्यात जावेद अख्तर विरोधात आंदोलन केले जात आहे. शिक्षकदिनी तोंडाला काळ फासून आंदोलन केले जात आहे.


 

पंजशीरमध्ये ६०० हून अधिक तालिबान्यांचा खात्मा करण्यात आलाय. पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबान आणि विद्रोही गटात रक्तरंजित युद्ध सुरू आहे. १ हजार तालिबान्यांनी शरणागती पत्कारल्याचा दावा रेजिस्टन्स फोर्सने केला आहे.


राज ठाकरे  पुण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करणार आहेत.


टोकियो पॅरोलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरला सुर्वण पदक तर सुहास यथीराजला रौप्य पदक मिळवले आहे.


कोल्हापूरात जलसमाधी आंदोलनचा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आलीय . जलसमाधी आंदोलन केल्यास कारवाई करू,असा इशारा कोल्हापूर पोलिसांनी दिला आहे. पूरग्रस्तांसाठी काढलेल्या पदयात्रेची दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी जलसमाधी आंदोलनावर ठाम आहेत.


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -