घरताज्या घडामोडीरिलायन्स प्रकल्पग्रस्त आणि भूमीपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

रिलायन्स प्रकल्पग्रस्त आणि भूमीपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Subscribe

नागोठणे येथील रिलायन्स कंपनी परिसरातील सुमारे ३५ वर्षे लढा देणार्‍या स्थानिक भूमिपूत्र, प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी आता आंबेडकर घराण्याने पुढाकार घेतला आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनलर कामगार युनियन, भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे ते चोळे यांच्या न्याय हक्कासाठी व आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेघर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.

भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आता १५ नोव्हेंबरला रिलायन्स नागोठणे कंपनीवर धडक दिली जाईल, अशा इशारा देतानाच नागोठणे ते चोळे विभागातील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणारच, अशी गर्जना भीमराव आंबेडकर यांनी केली. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी उपस्थित भूमिपुत्रांना मार्गदर्शन करताना भीमराव आंबेडकर म्हणाले की, १५ नोव्हेंबरपासून रिलायन्स कंपनीबरोबर निर्णायक लढा दिला जाईल आणि त्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार देऊन येणार्‍या पिढीला कायमस्वरुपी रोजगार मिळावा, ही न्याय मागणी केली जाईल, असे भीमराव आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

भूमिपुत्रांच्या जमिनीवर ही कंपनी उभी आहे. हे आंदोलन शांततेत होईल. पण जर का ठिणगी उडाली तर पूर्ण महाराष्ट्रात त्याचा भडका होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही भीमराव आंबेडकर यांनी स्पष्ट केले. या लढ्यामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व संघटनांचा पाठिंबा राहणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.


हे ही वाचा – Diwali 2021 : बंदी घातलेल्या बेरीयम सॉल्ट रसायन मिश्रीत फटाक्यांचा साठा जप्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -