घरAssembly Battle 2022Goa Assembly election results 2022 : थोड्या मतांनी, पण जिंकलो, गोव्यात सत्तास्थापनेचा...

Goa Assembly election results 2022 : थोड्या मतांनी, पण जिंकलो, गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करणार – प्रमोद सावंत

Subscribe

गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणारे डॉ प्रमोद सावंत यांचा गोवा विधानसभा निवडणूकीत अतिशय थोड्या फरकाने विजय झाला आहे. गोव्यातील सांकेलीम विधानसभा मतदारसंघातून डॉ प्रमोद सावंत यांना अवघ्या ३८६ मतांनी विजय मिळवता आला. या विजयाचे श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. पण त्याचवेळी अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला एकत्र घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी गोवा विधानसभा निवडणूक निकालानंतर दिली आहे.

- Advertisement -

माझ्या विजेतेपदाचे श्रेय हे कार्यकर्त्यांना जाते. मी मतदारसंघात नसतानाही झालेल्या कामांमुळेच मी जिंकू शकलो. कमी मताधिक्याने जिंकलो असलो तरीही जिंकलो आहे, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले उमेदवार प्रमोद सावंत यांनी दिली. आम्ही सर्व अपक्ष उमेदवार तसेच मगोपलाही सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार आहोत, असाही दावा प्रमोद सावंत यांनी केला आहे. प्रमोद सावंत यांना सातव्या फेरीअंती ११ हजार ५६१ मतदान झाले. तर कॉंग्रेसच्या धर्मेश सगलानी यांनीही अतिशय कडवी अशी टक्कर दिली. सगलानी यांना सातव्या फेरीच्या अखेरीस ११ हजार १७५ इतके मतदान झाले. अवघ्या ३८६ मतांनी डॉ प्रमोद सावंत यांचा विजय झाला.

Goa assembly election

- Advertisement -

गोव्यात भाजप बहुमताच्या जवळ आहे. त्यामुळेच अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला एकत्र घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती प्रमोद सावंत यांनी सांकेलीम मतदारसंघातील विजयानंतर दिली आहे. गोव्यात एकुण ४० जागांसाठी विधानसभेची निवडणूक पार पडली. गोव्यात बहुमतासाठीचा आकडा हा २१ आहे. तर गोव्यात आतापर्यंतच्या निकालानुसार भाजप १९ ठिकाणी आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस ११ जागांवर पुढे आहे. तर आम आदमी पार्टी पक्ष २ जागांवर पुढे आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये ३ ठिकाणी उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. तर गोवा फॉरवर्ड पार्टीला अवघ्या एका जागेवर आघाडी मिळाली आहे. रिव्होल्यूशनरी गोअन्स पार्टी १ जागेवर पुढे आहे.


Digambar Kamat : दिगंबर कामत ठरले जायंट किलर, मडगाव मतदारसंघात कॉंग्रेसची मुसंडी

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -