घरक्राइमपैशांसाठी मृतदेहाची विटंबना, मृत रुग्णावर २ दिवस केले उपचार

पैशांसाठी मृतदेहाची विटंबना, मृत रुग्णावर २ दिवस केले उपचार

Subscribe

दोन दिवस डॉक्टरांनी रुग्णावर उपचार सुरु असल्याचे सांगत नातेवाईकांकडून तब्बल ४१ हजारांहून अधिक पैसे घेतले

मृत्यूनंतर माणसाला मुक्ती मिळते असे म्हणतात मात्र इथे मृत्यूनंतरही मृतदेहाची विटंबना करण्यात आली आहे. मृत रुग्ण जिवंत असल्याचे सांगून नातेवाईकांकडून पैस उकळल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमधून समोर आलाय. (treated the dead patient for 2 days for money in sangli ) सांगलीतील इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअर रुग्णालयात हा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. त्या प्रकरणासंबंधी रुग्णालयाचे डॉ. योगेश रंगराव वराठकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. ते गेले दीड वर्षांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. इस्लामपूर येथे त्यांचे रुग्णालय आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी नातेवाईकांपासून लपवून ठेवून मृतदेहावर उपचार सुरु ठेवले. या धक्कायदायक घटनेमुळे रुग्णालयात मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना आहे मार्च २०२१मधील. डॉ. योगेश रंगराव वराठकर यांच्या रुग्णालयात २४ फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांची ६० वर्षीय आई सायरा उपचारांसाठी दाखल झाली. सायरा यांच्यावर नॉन कोव्हिड वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. ८ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र डॉक्टरांनी जाणून बुजून सायरा यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांपासून लपवले आणि त्यांच्या उपचार सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन दिवस डॉक्टरांनी सायरा यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगत नातेवाईकांकडून तब्बल ४१ हजारांहून अधिक पैसे घेण्यात आले.

- Advertisement -

रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दोन दिवसांनी नातेवाईकांना देण्यात आली. आम्हाला या दोन दिवसात डॉक्टरांकडून रुग्णाबाबत कोणताही अपडेट देण्यात आली नव्हती त्यावेळी आम्हाला शंका आली. मात्र  डॉक्टरांनी खोटी कागपत्रे आणि बिले देऊन रुग्णावर उपचार असल्याचे सांगितले, अशी तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृत रुग्णांच्या मृतदेहाची विटंबना आणि पैशासाठी फसवणूक करुन पैसे उकळल्याच्या आरोपाखाली डॉक्टर वाठारकर यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा – दिल्लीत एअरफोर्स कर्मचाऱ्यांच्या पत्नी व मुलाची डम्बेल्सने हत्या,सख्खा भाचा अटकेत

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -