घरताज्या घडामोडीUran : उरण चारफाटा येथील सिडकोच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे पाडली

Uran : उरण चारफाटा येथील सिडकोच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे पाडली

Subscribe

उरण चारफाटा येथे सिडकोच्या जागेत मागील अनेक वर्षांपासून अनधिकृतरीत्या गाळे आणि टपऱ्या काढून व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात सिडकोच्या अतिक्रमण विभागाने आज गुरुवारी ११ नोव्हेंबरला कारवाई केली. यावेळी अनेक अनधिकृत गाळे तोडण्यात आले. दरम्यान या कारवाईला काही स्थानिकांनी विरोध केला, मात्र पोलिस आणि सिडको अधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिकांचा विरोध झुगारून ही कारवाई करण्यात आली.उरण चारफाटा-ओएनजीसी मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा शेकडो झोपडपट्ट्या वसल्या आहेत. ओएनजीसीसह इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरणाऱ्या या झोपड्या हटविण्याची मागणी ओएनजीसीसह सुरक्षा यंत्रणेकडूनही सातत्याने केली जात होती.

उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील मोक्याच्या जागी ही अतिक्रमणे होती. व्यावसायिक गाळे आणि पक्की बांधकामे तोडण्यात आली. सिडकोच्या या मोकळ्या जागेवर ओएनजीसीतर्फे सुशोभिकरण आणि रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच सिडकोच्या अतिक्रमण विभागाने द्रोणागिरी नोड मधील सेक्टर ४९ आणि सेक्टर ५० मधील अनेक अतिक्रमणे आणि बांधकामे देखील तोडली आहेत. सिडकोच्या जागेत असलेली भंगारची दुकाने आणि टायरची दुकाने देखील उद्धवस्त केली. या कारवाईत सिडकोचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच उरण वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -

हे ही वाचा – खालापूरात रसायनमिश्रित पावडरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -