घरताज्या घडामोडीवाल, पोपटीचा हंगाम यंदा लांबणीवर?

वाल, पोपटीचा हंगाम यंदा लांबणीवर?

Subscribe

गेल्या काही दिवसांत वातावरणातील बदलामुळे वीटभट्टी, भातशेती यांसह अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ज्याप्रमाणे झाले, त्याप्रमाणेच तालुक्यासह उर्वरित रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने हिवाळ्यात घेतल्या जाणार्‍या वालाची शेती करणार्‍या शेतकर्‍यांना देखील मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.तालुक्यात हजार ते बाराशे एकरवर वालाची शेती केली जाते. मात्र वातावरणातील बदलाचा विचार करता दरवर्षी साधारण ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस केली जाणारी ही वालाची पेरणी अवघ्या २० टक्के शेतकर्‍यांनी केली आहे आणि त्या शेतीमधील सुद्धा जवळपास १० ते १५ टक्के वालाची शेती अवकाळी पावसामुळे पाण्याखाली गेल्यान शेतकर्‍यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

हिवाळ्यातील गुलाबी थंडी आणि या थंडीमध्ये शेकोटीसह कोकणात प्रचलित असणार्‍या पोपटीची यावर्षी अनेक खवय्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे. वातावरणातील बदलामुळे वालाच्या लागवडीसाठी झालेल्या विलंबाने किंबहुना लागवड होऊनही झालेल्या नुकसानीमुळे यावर्षी शेंगा वेळेवर पिकण्याची शक्यता कमी असल्याने कोकणातील प्रचलित असणार्‍या वालाच्या शेंगांच्या पोपटीला यावेळी थोडा विलंब लागणार आहे. वालाच्या शेंगा भाजीला नेण्यापेक्षा पोपटीसाठी मोठ्या प्रमाणात खवय्ये नेत असतात. त्यामुळे बदलत्या वातावरणात पोपटीच्या आनंदालाही काहीसे मुकावे लागणार आहे.

- Advertisement -

वातावरणातील बदलामुळे मवालाच्या पिकाला फटका बसत आहे. तर अनेकांनी अवकाळी पाऊस पडत असल्याने अजूनही वालाची पेरणी केली नाही. मात्र ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केल्यानंतर रोपांवर कीड लागली असेल तर योग्य ती कीटकनाशक फवारणी करून घ्यावी किंवा ज्यांच्या रोपांच्या मुळाला बुरशी लागली असेल तर त्यांनी बुरशीनाशक फवारणी करावी.
-ए. आर. रोकडे, तालुका कृषी अधिकारी, पेण

दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस वालाची पेरणी केली जाते. परंतु यावेळी वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे जवळपास दीड एकर शेतीमध्ये वालाच्या पिकाची पेरणी केली नाही. त्यामुळे दरवर्षी पोपटीसाठी जे खवय्ये जानेवारीच्या दरम्यान वालाच्या शेंगा खरेदी करून नेत होते त्यांना यावेळी वेळेवर वालाच्या शेंगा देता येणार नाहीत.
-राजेश पाटील, शेतकरी

- Advertisement -

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान खास कोकणातील वालाच्या शेंगांची पोपटी खायला जात असतो. मात्र यावेळी अवकाळी पावसामुळे आम्हाला या शेंगा खायला मिळतील की नाही आणि पोपटीची मजा अनुभवायला मिळते की नाही, ही शंकाच आहे.
-प्रवीण शिंदे, ग्राहक


हे ही वाचा  – Corona Vaccination: देशातील लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर; ४ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -