घरअर्थजगतबँकेत चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजार रुपये दंड

बँकेत चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजार रुपये दंड

Subscribe

मोठ्या देवाण-घेवाणीसाठी पॅनला पर्याय म्हणून आधार क्रमांकाचा वापर करण्याची सुविधा सरकारने दिली आहे. अशामध्ये आपण तसे आधार कार्ड वापरताना सावध राहणे गरजेचे आहे. बँकेमध्ये कामासाठी आपण चुकीचा आधार क्रमांक दिला, तर तुम्हाला दहा हजार रुपयांचा दंड लावला जाऊ शकतो. त्या संबंधातील तरतुदी जारी होण्याबरोबरच १ सप्टेंबर २०१९ पासून ही दंडात्मक तरतूदही जारी होण्याची शक्यता आहे.

बँक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार जर बँकेच्या कोणत्याही देवाण-घेवाणी संबंधातील व्यवहाराशी संलग्न कागदपत्रांमध्ये आधार कार्डचा क्रमांक जो दिला गेला असेल, तो योग्य नसल्याचे निष्पन्न झाले, तर त्यावर दहा हजार रुपये दंड लावला जाईल. अर्थात दंड लावण्यापूर्वी त्या व्यक्तींचा जबाबही ऐकला जाईल. अर्थसंकल्प ५ जुलैला सादर झाला. त्यामध्ये आधारशी संलग्न असणारे जे नियम तयार केले गेले आहेत, त्या दृष्टीने त्याच्या हिशेबाच्या नियमांनाही सुधारित केले जात आहे.

- Advertisement -

पॅन ऐवजी आधार वापरता येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केले. आता कलम २७२ बी मध्ये सुधारणा केली जाईल व पॅन उपयोगाशी संबंधित उल्लंघनाबाबत असणारी दंडात्मक कारवाई येथे लागू केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -